ज्या शहरात औरंगजेबला गाडलं, त्याच शहरात 'छावा'चं जोरदार प्रमोशन, विकीचे खास PHOTOS
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhaava: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘छावा’ चित्रपटातून लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता विकी कौशलने आज छत्रपती संभाजीनगर येथे येत घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं.
advertisement
1/7

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ‘छावा’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शंभूराजेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने शिव-शंभू प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
advertisement
2/7
‘छावा’मध्ये छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
3/7
अभिनेता विकी कौशल हा ‘छावा’च्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला आहे. यावेळी विकी कौशलने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक केला आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं.
advertisement
4/7
विकी कौशलने त्यानंतर शहरातील प्रसिद्ध क्रांती चौकात येऊन त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष केला.
advertisement
5/7
विकी कौशलला पाहिण्यासाठी क्रांती चौकात तरुण-तरुणींनी मोठी गर्दी केली होती. ज्या शहरात औरंगजेबाला कबर खोदावी लागली त्या शहरात विकी कौशल आल्याने शिव-शंभू प्रेमींनी एकच जल्लोष केला. विकी कौशलने उघड्या जीपमधून फिरत आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं.
advertisement
6/7
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘छावा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलीये. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या रुपात दिसणार आहे.
advertisement
7/7
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून शिव-शंभू प्रेमी आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्या शहरात औरंगजेबला गाडलं, त्याच शहरात 'छावा'चं जोरदार प्रमोशन, विकीचे खास PHOTOS