TRENDING:

बापरे बाप! मोजून थकाल पण संपणार नाहीत, इतके पदार्थ; सासरी असं स्वागत, जावईही थक्क

Last Updated:
158 Dishes For Son In Law : पत्नीच्या माहेरी पतीचा पाहुणचार तसा काही नवा नाही. पण सध्या सासुरवाडीत जावयाचा ज्या पद्धतीने पाहुणचार करण्यात आला ते पाहून त्या जावयासह पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे.
advertisement
1/5
OMG! मोजून थकाल पण संपणार नाहीत, इतके पदार्थ; सासरी असं स्वागत, जावईही थक्क
जावई घरी येणार म्हणजे प्रत्येक सासरवाडीत त्याच्या स्वागताची जय्यत तयारी होतेच. त्याला काय आवडतं, काय नाही हे पाहून त्याच्यासाठी पदार्थ बनवले जातात. पण फार फार तर किती पदार्थ केले जातील... 5, 10, 50... नाही तब्बल 158. हो बरोबर वाचलंत. 158 पदार्थ एका कुटुंबाने त्यांच्या जावयासाठी बनवले आहेत.
advertisement
2/5
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील तेनाली गावातील हे कुटुंब. ज्यांनी त्यांचा जावई श्रीदत्तसाठी 158 पदार्थ बनवले आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
3/5
मकरसंक्रांतींच्या दिवशी जावयाचा असा पाहुणचार करण्यात आला. श्रीदत्त आणि मोनिका यांची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत. आंध्र प्रदेशमध्ये यादिवशी अशा पद्धतीने जावयाचं स्वागत केलं जातं. पण हा पाहुणचार अधिकच खास ठरला.
advertisement
4/5
158 पदार्थ... इतके पदार्थ कदाचित आजवर कोणत्याच सासरच्यांनी कोणत्या जावयाचा केला नसावा.  158 पदार्थांमध्ये लाडू, बर्फी, हलवा, काजू कतली, तसेच आंध्र प्रदेशमधील पारंपारिक मिठाईंचा समावेश होता.
advertisement
5/5
सोशल मीडियावर जावयाच्या पाहुणचाराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा जावई नशीबवान आहे, आपल्यालाही अशीच सासुरवाडी हवी, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. (सर्व फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बापरे बाप! मोजून थकाल पण संपणार नाहीत, इतके पदार्थ; सासरी असं स्वागत, जावईही थक्क
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल