Friday Releases : शुक्रवारी थिएटर आणि OTT वर रिलीज होतायत या 10 नव्या फिल्म आणि सीरिज, सातवा तर पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday Releases : 16 जानेवारीच्या शुक्रवारी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर 10 नव्या फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत.
advertisement
1/10

हॅपी पटेल : खतरनाक जासूस (Happy Patel : Khatarnak Jasoos) : वीर दास दिग्दर्शित 'हॅपी पटेल : खतरनाक जासूस' ही एक अॅक्शन कॉमेडी थ्रिलर ड्रामा फिल्म आहे. रोमान्स, कॉमेडी ते अॅक्शन सीनपर्यंत अनेक गोष्टी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात आमिर खान, इमरान खान, मोना सिंह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
2/10
राहु केतू (Rahu Ketu) : 'राहु केतू' हा आगामी कॉमेडी ड्रामा आहे. या सिनेमात वरुण शर्मा, पुलकित सम्राट, शालिनी पांडे आणि चंकी पांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 16 जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
3/10
वन टू चा चा चा (One Two Cha Cha Chaa) : आशुतोष राणा अभिनीत 'वन टू चा चा चा' हा एक अॅक्शन एडवेंचर कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. यात प्रेम, हास्य, ड्रग्ज, गुंडे आणि वेडेपणा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील. 16 जानेवारीपासून हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळेल.
advertisement
4/10
अगं अगं सूनबाई! काय म्हणता सासूबाई (Aga Aga Sunbai! Kay Mhantay Sasubai) : 'अगं अगं सूनबाई! काय म्हणता सासूबाई' हा एक मराठी मसादेदार सिनेमा आहे. एका सासू-सूनेची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत आहेत. 16 जानेवारी 2025 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
5/10
28 ईयर्स लेटर : द बोन टेम्पल (28 Years Later : The Bone Temple) : राल्फ रिफन्स, जॅक ओ कोनेल आणि एम्मा अभिनीत '28 ईयर्ल लेटर : द बोन टेम्पल' हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा आहे. हा हॉरर थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांना 16 जानेवारीपासून थिएटरमध्ये पाहायला मिळेल.
advertisement
6/10
120 बहादुर (120 Bahadur) : फरहान अख्तर यांचा '120 बहादुर' हा सिनेमा 1962 मधील भारत-चीन युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट मेजर शैतान सिंह भाटी आणि 13 कुमाऊँ रेजिमेंटच्या 120 सैनिकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटात राशी खन्ना, विवान भटेना, अंकित सिवाच आणि एजाज खान यांच्याही भूमिका आहेत. 16 जानेवारीपासून हा सिनेमा प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळेल.
advertisement
7/10
मस्ती 4 (Mastii 4) : 'मस्ती 4' हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. मिलाप जावेरी दिग्दर्शित हा सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांचा हा सिनेमा 16 जानेवारीपासून झी 5 वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
advertisement
8/10
कलमकावल (Kalamkaval) : 'कममकावल' हा मल्याळम सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. 2000 च्या दशकावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात राजिशा विजयन, मालविका मेनन आणि जिबिन गोपीथाथ मुख्य भूमिकेत आहेत. 16 जानेवारीपासून प्रेक्षकांना सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.
advertisement
9/10
भा भा भा (Bha Bha Bha) : 'भा भा भा' हा अॅक्शन, थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांना 16 जानेवारीपासून झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
advertisement
10/10
प्रीपरेशन फॉर नेक्स्ट लाइफ (Preparation for the Next Life) : 'प्रीपरेशन फॉर नेक्स्ट लाइफ' हा सिनेमात एका महिलेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा रोमँटिक ड्रामा सिनेमा प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Releases : शुक्रवारी थिएटर आणि OTT वर रिलीज होतायत या 10 नव्या फिल्म आणि सीरिज, सातवा तर पाहाच