TRENDING:

प्रसिद्ध अभिनेत्रीला पीरियड्समध्ये करावा लागलेला रोमान्स, म्हणाली,"माझ्याकडे बदलायला कपडेसुद्धा नव्हते"

Last Updated:
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीला पीरियड्सदरम्यान धनुषसोबत रोमान्स करावा लागला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी तिच्याकडे बदलायला कपडेदेखील नव्हते.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेत्रीला पीरियड्समध्ये करावा लागलेला रोमान्स, म्हणाली,"माझ्याकडे..."
प्रसिद्ध अभिनेत्रीने शूटिंगदरम्यान आलेला एक वेदनादायक अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीला पीरियड्सदरम्यान धनुषसोबत रोमान्स करावा लागला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी तिच्याकडे बदलायला कपडेदेखील नव्हते.
advertisement
2/7
प्रसिद्धी मिळवणे सोपे नसते, हे आपण अनेक सेलिब्रिटींकडून ऐकत आलो आहोत. विशेषतः महिला अभिनेत्रींना सेटवर कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची सगळ्यांनाच कल्पना आहे. नुकतेच मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती थिरुवोथु यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.
advertisement
3/7
पार्वतीने काही दिवसांपूर्वी ‘हॉटरफ्लाय’सोबत केलेल्या एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, तिला पीरियड्सदरम्यान अभिनेता धनुषसोबत रोमान्स करावा लागला होता.
advertisement
4/7
पार्वतीसाठी हा अनुभव खूप वेदनादायक होता. पार्वती म्हणाली,“मी तमिळमध्ये ‘मरियान’ नावाचा चित्रपट केला आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मला पाण्यात भिजलेल्या हिरोसोबत रोमॅंटिक सीन करायचा होता. तो सतत माझ्यावर पाणी ओतत होता आणि तेव्हाच मला लक्षात आले की माझ्याकडे कपडे बदलण्यासाठी काहीच नाहीत.”
advertisement
5/7
पार्वतीने पुढे सांगितले की, ती दिग्दर्शकाकडे गेली आणि तिने कपडे बदलण्यासाठी हॉटेलला जाण्याची परवानगी मागितली, पण त्याने नकार दिला. त्यानंतर तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि तिने दिग्दर्शकाला सांगितले की तिला पीरियड्स आले आहेत. मात्र, हे ऐकून दिग्दर्शकाला काय प्रतिक्रिया द्यावी, हेच समजले नाही.
advertisement
6/7
पार्वतीला घरातसुद्धा पितृसत्ताक विचारांचा सामना करावा लागला. पीरियड्सबाबत तिला काहीच माहिती दिली गेली नव्हती. पाळीच्या दिवसांत तिला घराच्या एका कोपऱ्यात बसावे लागायचे.
advertisement
7/7
पार्वतीची 'मरियान' ही तमिळ फिल्म 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात पार्वतीने धनुषसोबत स्क्रीन शेअर केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्रीला पीरियड्समध्ये करावा लागलेला रोमान्स, म्हणाली,"माझ्याकडे बदलायला कपडेसुद्धा नव्हते"
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल