TRENDING:

Dhanush - Mrunal Thakur : 9 वर्षांनी लहान मराठमोळ्या मृणाल ठाकूरबरोबर लग्न करणार धनुष? मुहूर्तही ठरला!

Last Updated:
Dhanush - Mrunal Thakur : धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी काही महिन्यांआधी जोर धरला होता. त्यानंतर आता दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. काय आहे नेमकं प्रकरण?
advertisement
1/7
9 वर्षांनी लहान मराठमोळ्या मृणाल ठाकूरबरोबर लग्न करणार धनुष? मुहूर्तही ठरला!
साऊथ अभिनेता धनुष आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या काही महिन्यांआधी समोर आल्या होत्या. त्यानंतर मृणालने पुढे येत असं काही नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा मृणाल आणि धनुष चर्चेत आले आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि धनुष लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काय आहे हे प्रकरण आणि त्यात किती तथ्य आहे पाहूयात. 
advertisement
2/7
धनुष आणि मृणाल ठाकूर पुढील महिन्यात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे रोजी लग्न करू शकतात अशा चर्चा आहेत. दोघांचं लग्न हा एक खाजगी समारंभ असेल ज्यामध्ये फक्त जवळचे कुटुंब आणि मित्र उपस्थित राहतील, असं सांगण्यात येत नाही. 
advertisement
3/7
धनुष आणि मृणाल या दोघांच्या चाहत्यांना या चर्चा ऐकून विश्वास बसलेला नाही. त्याचप्रमाणे मृणाल ठाकूर किंवा धनुष किंवा त्यांच्या टीमने या चर्चांवर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. दोघांनीही त्यांचं वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवलं आहे. 
advertisement
4/7
ऑगस्ट 2025 मध्ये मृणाल ठाकूरने दोघांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं.  धनुष फक्त एक चांगला मित्र आहे असं ती म्हणाली होती. ओन्ली कॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत, मृणाल म्हणाली की सुरुवातीला तिला तिच्या आणि धनुषबद्दलच्या अफवा मजेदार वाटल्या.  धनुष मुंबईत तिच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाला खास तिच्यासाठी आला नव्हता. तर अजय देवगणने त्याला आमंत्रण दिलं होतं.
advertisement
5/7
'सन ऑफ सरदार 2' च्या त्याच पार्टीतील धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. व्हिडीओमध्ये मृणाल आणि धनुष हात धरून एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसले.
advertisement
6/7
शिवाय धनुषच्या 'तेरे इश्क में' सिनेमाच्या रॅप-अप पार्टीत मृणाल गेली होती. दोघांचा एकमेकांच्या सिनेमाशी काहीही कनेक्शन नसताना एकमेकांच्या सिनेमांच्या पार्ट्यांना गेले आणि त्यामुळेच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. 
advertisement
7/7
मृणाल धनुषच्या दोन्ही बहिणींना इंस्टाग्रामवर फॉलो करते आणि त्या मृणालला फॉलो करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोक धनुषच्या कुटुंबाला सोशल मीडियावर फॉलो करतात. असेही म्हटले जाते की त्यांचं नातं अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्यांना ते सगळ्यांना सांगायचं नाही. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhanush - Mrunal Thakur : 9 वर्षांनी लहान मराठमोळ्या मृणाल ठाकूरबरोबर लग्न करणार धनुष? मुहूर्तही ठरला!
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल