TRENDING:

एका गाण्यासाठी आणि कॉन्सर्टसाठी किती पैसे घेतो Honey Singh, त्याची एकूण प्रॉपर्टी किती?

Last Updated:
Honey Singh : प्रसिद्ध रॅपर हनी सिंह याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे रॅपर सध्या चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्या लाइफस्टाइलबद्दल.
advertisement
1/7
Honey Singh ची एकूण प्रॉपर्टी किती? एका गाण्यासाठी घेतो 'इतके' पैसे
प्रसिद्ध रॅपर हनी सिंह याचा 20 सेकंदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रॅपर शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 11 जानेवारी रोजी झालेल्या नानक अँड काऊनच्या दिल्ली कॉन्सर्टमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओनंतर हनी सिंह वादात सापडले आहेत.
advertisement
2/7
रॅपर हनी सिंह अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. नुकत्याच दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये तो शिवीगाळ करताना दिसला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान हनी सिंहच्या लाइफस्टाईलबद्दल जाणून घ्या.
advertisement
3/7
हनी सिंह वयाच्या 42 व्या वर्षी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याला आलिशान जीवनशैली जगायला आवडते. त्याच्या नावावर प्रचंड संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंह सुमारे 246 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
advertisement
4/7
हनी सिंहच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे मुंबई आणि गुरुग्राममध्ये घरे आहेत. गुरुग्रामच्या DLF परिसरातील त्याच्या घराची किंमत 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे नोएडामध्ये 4 कोटींची मालमत्ता आहे आणि दुबईतही एक व्हिला आहे. तसेच त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी गाड्या आहेत. ज्यामध्ये रोल्स रॉयस, ऑडी R8 V10 आणि जग्वार XJ L यांचा समावेश आहे.
advertisement
5/7
हनी सिंह एका गाण्यासाठी सुमारे 70 ते 90 लाख रुपये मानधन घेतो. लाइव्ह शो किंवा कॉन्सर्टसाठी त्याची फी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत असते. त्याचे मासिक उत्पन्न अंदाजे 1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याची एकूण संपत्ती 205 कोटी रुपये आहेत.
advertisement
6/7
हनी सिंह चित्रपट, शो आणि म्युझिक अल्बममधून मोठी कमाई करतो. तो अनेक ब्रँड एंडोर्समेंट्सशी जोडलेला असून त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते. ते नाईटक्लब आणि ‘बॅडफिट’ नावाच्या कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत, ज्यातून त्यांची मोठी कमाई होते.
advertisement
7/7
हनी सिंह गायक असण्यासोबतच अभिनयही करतो. त्याने ‘मिर्झा: द अनटोल्ड स्टोरी’, ‘तू मेरा 22 मैं तेरा 22’, ‘द एक्सपोज’, ‘जोरावर’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘यारियां 2’, ‘खेल खेल में’, ‘फतेह’, ‘रेड 2’, ‘हाऊसफुल 5’, ‘दे दे प्यार दे 2’, ‘छलांग’, ‘किक’, ‘रागिनी MMS 2’ यांसह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका गाण्यासाठी आणि कॉन्सर्टसाठी किती पैसे घेतो Honey Singh, त्याची एकूण प्रॉपर्टी किती?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल