पुण्यात भाजपच मोठा पक्ष
पुण्यात तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्काम ठोकला होता. तर केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार ताकद लावली अन् भाजपचा प्रचार केला होता. त्यानंतर आता पुण्याच भाजपच मोठा पक्ष ठरल्याचं पहायला मिळतंय. भाजपने राष्ट्रवादीचा सपाटून पराभव करत पुन्हा महापौर पदावर दावा ठोकला आहे.
advertisement
पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारला
प्रचारादरम्यान भाजपने '125 जागा जिंकू' असा दावा केला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकासकामांचा मुद्दा भाजपने पुढे केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या, मोफत पीएमपी आणि मेट्रो बससेवा, तसेच छोट्या घरांना मिळकतकर माफी. या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पण पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारला अन् भाजपला आपली पसंती दर्शवली.
पुण्यात आरएसएसचा प्रभाव
पुण्यात भाजपने जोरदार प्रचार केला तसेच पुण्यात आरएसएसचा छुपा प्रचार भाजपसाठी परिणामकारक ठरला. भाजपला आरएसएसच्या प्रचाराचा फायदा झाला. तसेच अनेक ठिकाणी हिंदूत्वावादी भूमिका परिणामकारक ठरल्याचं दिसून आलं. एवढंच नाही तर मातब्बर नेत्यांच्या मुलांनाच तिकीट दिल्याने अनेक ठिकाणी भाजपला काही जागांवर जास्त ताकद आणि पैसा लावला नाही. याचा फटका राष्ट्रवादीला बसला. तसेच अनेक जागेंवर ठाकरेंची मत राष्ट्रवादीने खालल्याचं पहायला मिळालं.
फडणवीसांची मुलाखत निर्णायक ठरली
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपली ताकद लावली. देवेंद्र फडणवीस यांची अखेरची मुलाखत भाजपसाठी निर्णायक ठरल्याचं पहायला मिळालं. यामध्ये त्यांनी कधी नव्हे ते अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.
गुन्हेगारांना तिकीट दिल्याचा फटका
अजित पवार यांनी गुन्हेगारांना तिकीट दिल्याने राष्ट्रवादीवर मोठी टीका होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा फटका बसलाय. अनेक ठिकाणी गुंडाना मतदारांना नाकारलं असून याचा फायदा मात्र भाजपला झाला. अजित पवार यांच्यावर भाजपने याच विषयावरून टीका देखील केली होती.
