TRENDING:

Mangal Gochar: ग्रहांची जत्रा मकर राशीत भरणार! 17 जानेवारीला त्रिग्रही-रूचक राजयोगाने 5 राशींना आनंदी-आनंद

Last Updated:
Mangal Gochar Horoscope: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरांना महत्त्व आहे, ग्रह ठराविक अंतराने राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. याचा राशीचक्रावर परिणाम होतो. ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ आज 16 जानेवारी रोजी मकर या आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहे.
advertisement
1/6
ग्रहांची जत्रा मकर राशीत! 17 जानेवारीला त्रिग्रही-रूचक राजयोग 5 राशींना लकी
मकर राशीत मंगळाच्या आगमनामुळे तिथे आधीच उपस्थित असलेले सूर्य आणि शुक्र यांच्यासोबत 'त्रिग्रही योग' तयार होत आहे. यासोबतच मकर राशीत मंगळाच्या गोचरमुळे 'रुचक राजयोग' देखील निर्माण होत आहे, तो साहस, शक्ती आणि यशाचे प्रतीक मानला जातो. या बदलाचा सर्वाधिक फायदा खालील 5 राशींना होणार आहे.
advertisement
2/6
मेष - मंगळ तुमच्या राशीच्या दहाव्या स्थानात गोचर करणार असल्याने करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमची नेतृत्व क्षमता वाढेल आणि विशेषतः सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना मोठा लाभ मिळेल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची ही वेळ आहे.
advertisement
3/6
कर्क - मंगळ तुमच्या सातव्या स्थानात प्रवेश करत असल्याने वैवाहिक जीवनात गोडवा आणि मजबूती येईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल. जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना चांगली स्थळे चालून येतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
advertisement
4/6
कन्या - मंगळ तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात प्रवेश करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळू शकते. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीतून धनलाभाचे संकेत आहेत आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक दृढता येईल.
advertisement
5/6
वृश्चिक - मंगळ तुमच्या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करत असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि साहस वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. मीडिया, मार्केटिंग आणि सेल्स क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. लहान प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरतील.
advertisement
6/6
मकर - मंगळ तुमच्याच राशीत (प्रथम स्थानी) प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता भक्कम होईल. करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठी झेप घेण्याची ही संधी आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar: ग्रहांची जत्रा मकर राशीत भरणार! 17 जानेवारीला त्रिग्रही-रूचक राजयोगाने 5 राशींना आनंदी-आनंद
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल