Reel Star Arun Tupe : राहत्या घरात सापडला मृतावस्थेत, रील स्टार अरुण तुपेला होता हा आजार; नातेवाईकांनी दिली माहिती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Reel Star Arun Tupe Death : छत्रपती संभाजीनगरचा प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपेच्या मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याच्या मृत्यूसंबंधी त्याच्या नातेवाईकांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं निधन झालं. राहत्या घरात तो मृतावस्थेत सापडल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. आपल्या विनोदी व्हिडीओमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अरुणच्या निधनाची माहिती समोर येताच सगळेच हादरले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
2/7
अरुण तुपे विविध विषयांवर तो रील्स तयार करत असे. भावनिक, सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आधारित त्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असत. त्याच्या वेगळ्या शैलीमुळे आणि मांडणीमुळे सोशल मीडियावर त्याची मोठी ओळख निर्माण झाली होती.
advertisement
3/7
इन्स्टाग्रामवर त्याला तब्बल 179K हून अधिक लोक फॉलो करत होते. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
advertisement
4/7
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बालाजी नगर येथे राहत होता. 10 मार्च रोजी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.
advertisement
5/7
अरुणच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्याने आत्महत्या केली का, त्याची हत्या झाली का किंवा नैसर्गिक कारणामुळे त्याचा मृत्यू झाला का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
advertisement
6/7
दरम्यान अरुणच्या जवळच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला फिट्स म्हणजेच Epilepsy या आजार होता. मात्र त्याचा मृत्यू याच कारणामुळे झाला का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
7/7
अरुण तुपे सारख्या तरुण आणि उमद्या क्रिएटरचं असं जाणं धक्कादाक आहे. त्याचे हजारो चाहते, मित्रमंडळी आणि अनेक रील स्टार्स त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अरुणच्या निधनाने सोशल मीडिया विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Reel Star Arun Tupe : राहत्या घरात सापडला मृतावस्थेत, रील स्टार अरुण तुपेला होता हा आजार; नातेवाईकांनी दिली माहिती