खूप इरिटेटिंग आहे! मालिका सुरू होऊन आठवडाही झाला नाही तोच कंटाळले प्रेक्षक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mi Jinkun Ghein Saara : नवीन मालिका सुरू होऊन काही दिवसच झालेत तोच या मालिकेतील मुख्य पात्राला, त्याच्या आवाजाचा प्रेक्षक वैतागले आहेत.
advertisement
1/7

गेले काही दिवस नव्या मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. काही नव्या मालिका सुरूही झाल्या आहेत. नव्या मालिका म्हटलं की ती पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. सामान्यपणे नवीन मालिका असताना लोकांमध्ये त्याची क्रेझ असते. पण एक अशी नवी मालिका ज्यातील मुख्य पात्रालाच प्रेक्षक कंटाळले आहेत.
advertisement
2/7
16 मार्च रोजी सुरू झालेली ही मालिका. ज्यातील मुख्य पात्रालाच प्रेक्षक कंटाळले आहेत. या मालिकेच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यावर प्रेक्षकांच्या कमेंट आल्या आहेत.
advertisement
3/7
सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मालिकेच्या प्रोमोवर एका युझरने "खूप इरिटेटिंग पात्र आहे", असं म्हटलं आहे. यावर रिप्लाय देताना आणखी एका युझरने, "मलाही ती आवडत नाही, तिचा आवडत ऐकू वाटत नाही, खूप इरिटेट करतो तिचा आवाज", अशा कमेंट केल्या आहेत.
advertisement
4/7
प्रेक्षकांना ज्या मालिकेतील मुख्य पात्र आवडलं नाही, तिच्या आवाजाचा कंटाळा आला ती मालिका आहे मी जिंकून घेईन सारं. कलर्स मराठीवरील ही मालिका 16 मार्चपासून सुरू झाली आहे. ती संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होते.
advertisement
5/7
रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात, ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी असतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायला देखील मागं पुढे पाहत नाहीत. ही मालिका याच धाग्यावर आधारित आहे.
advertisement
6/7
मालिकेतील छवी हे पात्र जे रक्ताच्या नात्यापलीकडील असं नातं दाखवतं. मालिकेत बाई- आजी म्हणजे तिच्यासाठी देवासमान आहेत. त्यांच्यासाठी आणि राजगुरू परिवारासाठी छवी काहीही करू शकते.
advertisement
7/7
मालिकेतील छवीचं पात्र साकारलं आहे ते अभिनेत्री जान्हवी तांबटने. जान्हवी तांबट याआधी झी मराठीवरील लक्ष्मी निवास आणि सोनी मराठीवरील 'अमोल प्रितीची अजब कहाणी' या मालिकांमध्ये दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खूप इरिटेटिंग आहे! मालिका सुरू होऊन आठवडाही झाला नाही तोच कंटाळले प्रेक्षक