गोवा सांगून नको तिथंच नेलं! मराठी अभिनेत्रीला नवऱ्याने फसवलं, हनीमूनला भलत्याच ठिकाणी फिरवलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गोव्याला नेतो सांगून प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला तिच्या नवऱ्याने हनिमूनच्या दिवशीच फसवलं. गोवा नाही मग नेमकं कुठे घेऊन गेला होता अभिनेत्रीला तिचा नवरा?
advertisement
1/10

प्रत्येक मुलीसाठी लग्नानंतरचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतात. नवऱ्यासोबत हनिमूनला जाणं हे प्रत्येकीचं स्वप्न असतं.
advertisement
2/10
अनेकदा बायकोच्या आवडीच्या ठिकाणी हनिमूनला जातात. हनिमूनचे दिवस प्रत्येक कपलसाठी गोल्डन मुमेन्ट्स असतात. ज्या आयुष्यभर लक्षात राहतात.
advertisement
3/10
पण एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला तिच्या नवऱ्याने हनिमूनला नेलं आणि तिथेच फसवलं. गोवा सांगून तिला दोन दिवस भलत्याच ठिकाणी फिरवलं.
advertisement
4/10
अभिनेत्रीनं स्वत: तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला. अभिनेत्रीचा हा किस्सा ऐकून अनेकांना हसू आवरलं नाहीये. एक नवरा आपल्या बायकोबरोबर असं कसं करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
5/10
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री बिग बॉस मराठी 6 च्या घरात असलेली दिपाली सय्यद. बिग बॉस मराठी 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर अभिनेत्री दिपाली सय्यदने व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला.
advertisement
6/10
दिपाली म्हणाली, "लग्न झाल्या झाल्या फिरायला जायचं होतं. ते मला म्हणाले, तुला कुठे जायचं आहे. म्हटलं मला गोवा बघायचं आहे. म्हणाले जाऊया. आम्ही तेव्हा बाईकवरूनच फिरायचो. ते मला खूप दुरून दुरून घेऊन गेले."
advertisement
7/10
"आम्ही एक रिसॉर्ट बुक केला. बीचवर गेलो. छान फिरलो तिथे. दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी कोल्ड्रिंग घ्यायला गेलो. कोल्ड्रिंकवाल्याच्या शेजारी मी नाव वाचलं गोराई."
advertisement
8/10
दिपालीनं हसत हसत पुढे सांगितलं, "मी म्हटलं गोराईत कुठे आलो. मी त्याला विचारलं आपण कुठे आहोत गोराईत. तो म्हणाला, नाही गोव्यात. मी दुकानदाराला विचारलं हे ठिकाण काय आहे, कुठे आहे. तो म्हणाला गोराईत आहात तुम्ही. म्हणजे मी गोवा समजून दोन दिवस गोराईत फिरत होते."
advertisement
9/10
दिपाली नवऱ्याला लटक्या रागानं म्हणाली, "मी आजही सांगते तुम्हाला तुम्ही मला तेव्हाही उल्लू बनवलं होतं. गोवा सांगून गोराईला घेऊन गेले होतात."
advertisement
10/10
"पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोन दिवस आम्ही एन्जॉय केले होते. गोवा आहे की गोराई, एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे बॉबी. आय लव्ह यू."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गोवा सांगून नको तिथंच नेलं! मराठी अभिनेत्रीला नवऱ्याने फसवलं, हनीमूनला भलत्याच ठिकाणी फिरवलं