Deepali Sayyad : दीपाली सय्यद बिग बॉसच्या घरात, बाहेर कुटुंबावर दु:खाचा डोंगर; गमावली जवळची व्यक्ती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
दीपाली सय्यद बिग बॉस मराठी 6 मध्ये आहे. पण बाहेर तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपालीच्या नवऱ्याने ही माहिती दिली.
advertisement
1/7

अभिनेत्री दीपाली सय्यद सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. घरात ती उत्तम खेळ खेळताना दिसतेय. पण बाहेर तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. दीपालीच्या घरातील तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. दीपालीचा नवरा बॉबी सय्यद यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना ही माहिती दिली.
advertisement
2/7
अभिनेत्री दीपाली सय्यदच्या सासूचं निधन झालं आहे. दीपालीचं तिच्या सासूसोबत खूप चांगलं नातं होतं. त्या तिला मुलीसारखं मानत होतं. एकीकडे दीपाली बिग बॉसच्या घरात आहे याचा घरच्यांना आनंद आहे तर दुसरीकडे आई गमावल्याचं दु:ख देखील आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखती बोलताना बॉबी सय्यद आणि दीपालीच्या मुलाने दोघींच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
advertisement
3/7
दीपालीचा नवरा म्हणाली, "नुकतंच माझ्या आईचं निधन झालं आणि ती दीपालीच्या खूप क्लोज होती. ती दीपालीला मुलगीच मानायची. तू बिग बॉस जिंकल्यावर मी नक्की येईन, असं माझी आई नेहमी म्हणायची. मी दीपालीला काही सांगितलं नाही कारण ती आतमध्ये खूप चांगलं खेळतेय. खेळासोबतच जे झालं ते झालं. माझ्या आईला नेहमीच दीपालीची साथ लागायची. डॉक्टरकडे जायचं असेल तर ती दीपालीलाच घेऊन जायची. दीपाली माझ्याबरोबर नेहमीच स्ट्राँगली उभी राहिली आहे त्यामुळे मीपण तिला खूप मिस करतोय."
advertisement
4/7
"माझी आई शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा ती जास्त प्रतिसाद देत नव्हती तेव्हा मी तिला दीपालीचा आवाज ऐकवायचो. तिचे डोळे बंद होते पण दीपालीचा आवाज ऐकल्यानंतर तिचे आयब्रो हलकेसे हलायचे."
advertisement
5/7
"मी पहिल्यांदा दीपालीला इतकं मिस करतोय कारण सगळे निर्णय मला घ्यावे लागत आहेत. माझी आई 2 फेब्रुवारीला वारली म्हणून आम्ही दीपालीला सांगितलं नाही. तिला हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल."
advertisement
6/7
बॉबी सय्यद पुढे म्हणाले, "आम्हाला नव्हतं वाटलं, कारण दोनवेळा आई ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि आई आलेली परत. यावेळी पण असंच वाटलेलं म्हणून मी नाही सांगितलं. दीपालीने कायम पुढे जावं अशी माझ्या आईची इच्छा होती. आईने दीपालीला नेहमी मुलीसारखा सपोर्ट केला. दीपाली अशी एकमेव अभिनेत्री असेल जी लग्नानंतर मेन हिरोईन बनली. मुलाच्या जन्मानंतर तिचं खऱ्या अर्थानं करिअर झालं.
advertisement
7/7
दीपालीच्या मुलानं सांगितलं, "आजी पहिल्यापासूनच आईसोबत खूप क्लोज होती. आई आणि आजी संपूर्ण घर सांभाळत होत्या. पप्पांवर घराची तेवढी जबाबदारी नव्हती. पण आता सगळे निर्णय त्यांना घ्यावे लागत आहेत. शेवटपर्यंत आजी पप्पा आणि आईलाच शोधत होती. आजीला सगळ्यांची नावं लक्षात राहत नव्हती. पण तिला आई आणि पप्पा माहिती होते. ती शेवटपर्यंत दीपाली कुठे आहे असं विचारत होती."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Deepali Sayyad : दीपाली सय्यद बिग बॉसच्या घरात, बाहेर कुटुंबावर दु:खाचा डोंगर; गमावली जवळची व्यक्ती