रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 बाबत मौन का? दीपिका पादुकोणने अखेर खरं कारण सांगितलंच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Ranveer Deepika : अभिनेता रणवीर सिंगचा धुरंधर 2 ची सगळीकडे चर्चा होत असताना अभिनेत्री दीपिका पादुकोणने यावर कोणती प्रतिक्रिया का दिली नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता. अखेर अभिनेत्रीने यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/8

रणवीर सिंगचा धुरंधर 2 अक्षरश: धुमाकूळ घालतो आहे. प्रेक्षकच नाही तर बडेबडे सेलिब्रिटी याचं कौतुक करत आहेत, त्यांची प्रतिक्रिया येत आहे. पण रणवीरच बायको अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने मात्र यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे याबाबत चर्चा होते आहे.
advertisement
2/8
नवऱ्याची फिल्म इतकी हिट झाली पण त्याच्या या यशावर दीपिका काहीच का बोलत नाही? कुठेच प्रतिक्रिया का देत नाही? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले. अखेर दीपिकाने यावर आपलं मौन सोडलं आहे आणि यामागील कारण स्वत:च सांगितलं आहे.
advertisement
3/8
दीपिकाने रणवीरच्या धुरंधर 2 वर का प्रतिक्रिया देत नाही, याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवर दीपिकाने कमेंट केली आहे.
advertisement
4/8
व्हिडीओमध्ये विचारण्यात आलं होतं. धुरंधर 2 वरील दीपिकाचं हे मौन दिग्दर्शकाविरोधातील विधान आहे की, इंटरनेटवरील फेव्हरेट ड्रामापासून दूर राहण्याचा एक मार्ग
advertisement
5/8
यावर कमेंट करताना दीपिकाने दुसरा ऑप्शन सांगितला आहे. तिने कमेंटमध्ये म्हटलं, दुसरं, माय फ्रेंड. मी तुमच्या सगळ्यांच्या आधी फिल्म पाहिली आहे. आता सांगा कोणाची चेष्टा झाली आहे.
advertisement
6/8
दरम्यान दीपिकाने धुरंधर 2 आणि रणवीर सिंगच्या यशावर थेट प्रतिक्रिया दिली नसली. तरी पतीचं हे यश सेलिब्रेट करण्यासाठी दोघंही डेटवर गेले होते. ज्याचा व्हिडीओ आणि फोटोही समोर आले होते.
advertisement
7/8
रिपोर्टनुसार धुरंधर 2 ने कमाईच्या बाबतीत 1600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रणवीरच्या या फिल्मने कमाईचे रेकॉर्ड मोडले पण तरी दीपिकाचा रेकॉर्ड तो मोडू शकला नाही.
advertisement
8/8
रणवीरच्या फक्त 2 फिल्मने 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर दीपिकाच्या 3 फिल्म्सने 1000 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 बाबत मौन का? दीपिका पादुकोणने अखेर खरं कारण सांगितलंच