दररोज एक नवीन हेअर स्टाइल, 'वहिनीसाहेब' केसांसाठी विग वापरायची? धनश्री काडगांवकर स्वत:च खरं काय ते सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री धनश्री काडगांवकर वहिनीसाहेब ही भूमिका साकारणाऱ्या दररोज एक नवीन हेअर स्टाइल करायची. हेअर स्टाइल करण्यासाठी ती खरंच विग वापरायची का?
advertisement
1/9

मालिका विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीकडे प्रेक्षकांचं बारिक लक्ष असतं. अभिनेत्रींचा फक्त अभिनयच नाही तर त्यांचे कपडे, हेअर स्टाइल, ज्वेलरी या सगळ्याच गोष्टी चर्चेत येतात.
advertisement
2/9
एखाद्या मालिकांमध्ये नायिकेनं नेसलेली साडी, टिकली असो किंवा ज्वेलरी, साड्या या लगेच मार्केटमध्ये ट्रेंड होतात. जान्हवीचं मंगळसूत्र हे याचं उत्तम उदाहरण आहे.
advertisement
3/9
एखाद्या अभिनेत्रीनं तिच्या लुकमध्ये थोडा जरी बदल केला तरी प्रेक्षकांच्या तो लगेच लक्षात येतो. तसा फिडबॅकही अभिनेत्रींना किंवा अभिनेत्याला मिळतो.
advertisement
4/9
अशीच एक अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत तिनं साकारलेली वहिनीसाहेब ही भूमिका टेलिव्हिजनच्या इतिहासातील हिट खलनायिका होती.
advertisement
5/9
आजही वहिनीसाहेबांची तितकीच क्रेझ आहे. वहिनीसाहेबांची बोलण्याची स्टाइलच नाही त्यांच्या साड्या आणि दागिने देखील तितकेच खास होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वहिनीसाहेबांची हेअर स्टाइल.
advertisement
6/9
अभिनेत्री धनश्री काडगावक वहिनीसाहेब ही भूमिका साकारताना दररोज एका वेगळ्या हेअर स्टाइलमध्ये समोर यायची. अनेकदा ती केसांसाठी विग वापरते असं वाटायचं. चाहत्यांनी तिला याबाबत अनेक प्रश्न देखील विचारले.
advertisement
7/9
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना धनश्रीनं ती केसांना विग वापरते या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अभिजात मराठी ओटीटीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना धनश्री म्हणाली, "माझ्या आईचे केस अत्यंत जाड,सुंदर आणि लांब असे होते. त्यामुळे माझे केसही प्रचंड जाड आहेत. हेअर ड्रेसरला माझे केस स्टाईलिंग करत असताना एक-दीड तास जातो. खरंच त्यांनाही त्रास होतो. "
advertisement
8/9
धनश्री पुढे म्हणाली, "खूप जणं मला हा प्रश्न विचारतात की मॅम तुम्ही सीरियलमध्ये विग लावत का? तुमचे केस किती जाड आहेत. तर नाही. हे तुम्ही चुकीचं ऐकलेलं आहे.
advertisement
9/9
"मी विग लावत नाही. माझ्या केसांचं टेक्श्चरच खूप जाड आहेत. एक एक केस प्रचंड जाड आहे. मला त्यांचा आनंद आहे. गेली अकरा-बारा वर्षे मी केस स्टाईलिंग करते आहे. नशीबाने माझे केस अजूनही चांगले आहे", असंही ती म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दररोज एक नवीन हेअर स्टाइल, 'वहिनीसाहेब' केसांसाठी विग वापरायची? धनश्री काडगांवकर स्वत:च खरं काय ते सांगितलं