धर्मेंद्र-राखीचं हे रोमँटिक गाणं, आज 55 वर्षांनीही ऑफिस सुटल्यावर हमखास ऐकतात लोक, युट्यूबवर मिळालेत 157 मिलियन व्ह्यूज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dharmendra Rakhee : धर्मेंद्र आणि राखी यांनी अनेक रोमँटिक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण त्यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं मात्र आज 55 वर्षांनीही लोक पुन्हा-पुन्हा ऐकतात.
advertisement
1/7

धर्मेंद्र आणि राखी यांच्या ऑन-स्क्रीन जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजवर या जोडीने अनेक रोमँटिक चित्रपट दिले आहेत. आजच्या नव्या म्युझिक आणि रीमिक्सच्या गाण्यांमध्येही धर्मेंद्र आणि राखी यांच्या एका जुन्या रोमँटिक गाण्याची क्रेझ कायम दिसते.
advertisement
2/7
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक गाणी आली आहेत. पण त्यातील काहीच गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. धर्मेंद्र आणि राखी यांचं 55 वर्षांपूर्वी आलेलं एक रोमँटिक गाणं आजही सोशल मीडिया ते युट्यूबपर्यंत सर्वत्र लोकप्रिय आहे.
advertisement
3/7
धर्मेंद्र आणि राखी यांच्या या सुपरहिट गाण्याला युट्यूबवर 157 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आज 55 वर्षांनंतरही प्रत्येक वयोगटातील लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं आहेत. गाण्याचे बोल आणि सिनेमॅटोग्राफीमुळे या गाण्याचा बॉलिवूडच्या सदाबहार गाण्यांमध्ये समावेश झाला आहे.
advertisement
4/7
धर्मेंद्र आणि राखी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं 'जीवन मृत्यू' या चित्रपटातील आहे. प्रेक्षकांना भावणारं हे गाणं आहे. ऑफिस सुटल्यानंतर अनेक मंडळी हमखास हे गाणं ऐकतातच. अनेकांना एकांतात हे गाणं ऐकायला आवडतं.
advertisement
5/7
धर्मेंद्र आणि राखी गुलजार यांच्या जोडीने 'जीवन मृत्यू' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं. आनंद बक्शी यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते. तर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलं होतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं.
advertisement
6/7
'झिलमिल सितारों का आंगन होगा' या गाण्यात एका गरीब मुलाची आणि श्रीमंत मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आजही हे गाणं अनेकांना वेड लावतं.
advertisement
7/7
'झिलमिल सितारों का आंगन होगा' हे गाणं सुपरहिट होण्यामागे या गाण्याचे बोल, कलाकारांचा नॅचरल अभिनय आणि गाण्यातला साधेपणा या गोष्टी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
धर्मेंद्र-राखीचं हे रोमँटिक गाणं, आज 55 वर्षांनीही ऑफिस सुटल्यावर हमखास ऐकतात लोक, युट्यूबवर मिळालेत 157 मिलियन व्ह्यूज