TRENDING:

Dhurandhar 3 ची चर्चा, 10 कलाकारांचा पत्ता कट? 'धुरंधर 2' मधील बडे कलाकार दिसणार नाहीत

Last Updated:
Dhurandhar 3 : धुरंधर 2 च्या क्लायमॅक्सपर्यंत काही प्रसिद्ध पात्रांच्या कथा संपल्या आहेत. असे एक दोन नाही तर तब्बल 10 कलाकार आहेत. ते कोणते पाहुयात.
advertisement
1/11
Dhurandhar 3 ची चर्चा, 10 कलाकारांचा पत्ता कट? 'धुरंधर 2' मधील बडे कलाकार दिसणार नाहीत
'धुरंधर'नंतर धुरंधर 2 नेही अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षकांना धुरंधर 3 ची प्रतीक्षा आहे. धुरंधरच्या दोन्ही पार्टचं यश आणि धुरंधर 2 चा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर आता धुरंधर 3 येणार अशी चर्चा होते आहे. याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. पण धुरंधर 3 आला तरी यामध्ये 10 कलाकारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.  पहिल्या दोन पार्टमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे 10 कलाकार तिसऱ्या भागात दिसणार नाही. कारण धुरंधर 2 च्या क्लायमॅक्सपर्यंत काही प्रसिद्ध पात्रांच्या कथा संपल्या आहेत. ते कोणते पाहुयात.
advertisement
2/11
एस. पी. चौधरी अस्लम (संजय दत्त) : फिल्ममधील सर्वात महत्त्वपूर्ण पात्रांपैकी एक, एस. पी. चौधरी अस्लम, हमजाचा हा कट्टर शत्रू तिसऱ्या पार्टमध्ये नसेल. 'धुरंधर 2' मधील एका भीषण आत्मघाती हल्ल्यात त्याच्या मृत्यूच्या दृश्याने प्रेक्षकांना हादरवून सोडलं. अस्लमची भूमिका साकारली ती संजय दत्तने, तो आता तिसऱ्या भागात दिसणार नाही.
advertisement
3/11
मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) : 'धुरंधर 2' मध्ये मेन व्हिलन आणि आयएसआयचा सूत्रधार मेजर इक्बालचाही शेवटी मृत्यू दाखवला आहे. फिल्मच्या शेवटी रणवीर सिंग म्हणजेच हमजाने त्याला एका तेलाच्या टँकरला बांधून स्फोटात उडवून दिलं. अर्जुन रामपालने या नकारात्मक छटा असलेल्या भूमिकेत जीव ओतला होता, पण आता त्याचा अध्याय संपला आहे.
advertisement
4/11
सुविंदर विकी (ब्रिगेडियर जहांगीर) : चित्रपटात मेजर इक्बालच्या म्हणजे अर्जुन रामपालच्या वडिलांची भूमिका साकारणारे सुविंदर विकी ज्यांना त्यांच्या मुलानेच मारलेलं दाखवलं आहे. ब्रिगेडियर जहांगीर यांनी हे पात्र साकारलं.
advertisement
5/11
मोहम्मद आलम (गौरव गेरा) : गौरव गेरा यांनी मोहम्मद आलमच्या भूमिकेत आपली विनोदी प्रतिमा मोडून एक गंभीर भूमिका साकारली. ते भारतीय गुप्तहेर पथकाचा एक महत्त्वाचा भाग बनले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि हमजासाठी आपला जीव धोक्यात घातला. चित्रपटात गोळी लागल्याने त्यांच्या पात्राचा मृत्यू होतो.
advertisement
6/11
पिंडा उर्फ ​​गुरबाज सिंग (उदयवीर संधू) : फिल्ममधील सर्वात थरारक ॲक्शन दृश्यांपैकी एक म्हणजे पिंडा आणि हमजा यांच्यातील वॉशरूममधील झटापट. उदयवीर संधूने पिंडा या निर्दयी खलनायकाची भूमिका साकारली. त्याचाही लढाईत मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जसकिरतचा जिवलग मित्र आणि हमजाचा शत्रू असलेला पिंडा उर्फ ​​गुरबाज सिंगही तिसऱ्या भागात नसेल.
advertisement
7/11
जावेद खानानी (अंकित सागर) : अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी नेटवर्क यांच्यातील दुवा असलेल्या जावेद खाननीला हमजाने एका गुप्त मोहिमेदरम्यान संपवलं. अंकित सागरने ही छोटी पण प्रभावी भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती, पण आता त्याची कहाणी संपली आहे.
advertisement
8/11
झहूर मिस्त्री (विवेक सिन्हा) : झहूर मिस्त्री, IC 814 हाईजॅकर ज्याला हमजाने आपल्या पर्सनल हिट लिस्टमध्ये ठेवलं होतं. त्याला संपवून त्याने सूड घेतला. विवेक सिन्हाने ही भूमिका साकारली होती.
advertisement
9/11
आतिफ अहमद (सलीम सिद्दिकी) : सलीम सिद्दिकीने आतिफ अहमदची भूमिका साकारली होती, जो एक कट्टर शत्रू होता आणि मिशन धुरंधर दरम्यान टीमने त्याला घेरून ठार केले, ज्यामुळे दहशतवादी नेटवर्कमधील एक मोठा दुवा तुटला.
advertisement
10/11
फिल्मच्या स्टोरीत सगळ्यात भयानक वळण अर्शाद पप्पूच्या मृत्यूने आले. उझैर बलोचने त्याचा सर्वांसमोर शिरच्छेद करणं आणि नंतर त्याच्या डोक्याने फुटबॉल खेळणं, हे फिल्ममधील सर्वात भयानक दृश्यांपैकी एक होते. या दृश्यासह अश्विन धरच्या फिल्ममधील प्रवासाचा शेवट झाला.
advertisement
11/11
अझीम चीमा (विनोद थरानी) : संपूर्ण कटामागे असलेला लष्कर-ए-तोयबाचा हा सूत्रधार अझीम चीमा दुसऱ्या पार्टच्या अखेरीस मारला गेला. विनोद थरानीने हे पात्र साकारलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 3 ची चर्चा, 10 कलाकारांचा पत्ता कट? 'धुरंधर 2' मधील बडे कलाकार दिसणार नाहीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल