TRENDING:

Dhurandhar सुपरहिट पण 'Border 2'मध्ये अक्षय खन्नाला डावललं, सनी देओलसोबत ही आहे स्टारकास्ट

Last Updated:
Akshaye Khanna Border 2 : अक्षय खन्ना अभिनीत 'धुरंधर' ही फिल्म सुपरहिट ठरली असली तरी दुसरीकडे या अभिनेत्याला 'बॉर्डर 2'मधून डावलण्यात आलं आहे.
advertisement
1/7
Dhurandhar सुपरहिट पण 'Border 2'मध्ये अक्षय खन्नाला डावललं
'बॉर्डर' हा देशभक्तीपर युद्धपट 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवालाच्या लढाईवर ही फिल्म आधारित होती. जे.पी.दत्ता दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. आजही देशभक्तीची भावना जागृत करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
advertisement
2/7
'बॉर्डर'च्या रिलीजनंतर तब्बल 29 वर्षांनी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा सीक्वेल अर्थात 'बॉर्डर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'बॉर्डर 2'चा जबरदस्त, अंगावर शहारे आणणारा पहिला टीझर आऊट करण्यात आला आहे. 23 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
3/7
'बॉर्डर 2'च्या टीझरमध्ये सनी देओल, दिलदीत दोसांझ, अहान शेट्टी, वरुण धवन या नव्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. नव्या कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहेच. पण 'बॉर्डर'मधील कलाकारांचा विचार न झाल्याने काही चाहते नाराजी व्यक्त करत आहे.
advertisement
4/7
'बॉर्डर'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांवर विशेष छाप पाडत आहे. अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अक्षयचा 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असला तरीही 'बॉर्डर 2'मधून त्याला डावलण्यात आलं आहे.
advertisement
5/7
अक्षय खन्नाला रहमान डकैतच्या भूमिकेत झळकवणाऱ्या 'धुरंधर'च्या कास्टिंग डिरेक्टरचं मात्र Border 2 सोबत खास कनेक्शन आहे. 'धुरंधर'चे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी 'बॉर्डर 2'बाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. मुकेश छाब्रा यांनी लिहिलं आहे,"बॉर्डर 2' रिलीज झाला असून पुन्हा एकदा एक ऐतिहासिक गोष्ट पाहायला उत्सुक आहे. 'बॉर्डर 2'साठी काम करताना मजा आली. टीझर रिलीज झाल्यानंतर अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. दिग्दर्शक अनुराग सिंह, अहान, दिलजीत, वरुण आणि सनी पाजीला खूप-खूप शुभेच्छा".
advertisement
6/7
अक्षय खन्नाप्रमाणेच 'बॉर्डर 2'मधून सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांनाही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
advertisement
7/7
'बॉर्डर 2' या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच सोनम बाजवा, मोना सिंह, मेधा राणा आणि परमवीर चीमा हे कलाकारदेखील झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar सुपरहिट पण 'Border 2'मध्ये अक्षय खन्नाला डावललं, सनी देओलसोबत ही आहे स्टारकास्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल