Dhurandhar: अक्षय खन्नाच्या 'उल्फत'सोबत 17 व्या वर्षी घडलेली भयानक घटना! बाईकवाल्याने एकटीला गाठलं अन्....
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar Actress Saumya Tandon: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटात 'उल्फत'ची छोटी पण दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटना नुकतीच समोर आली आहे.
advertisement
1/10

मुंबई: टेलिव्हिजनवर 'भाभीजी घर पर हैं' मधील 'अनीता भाभी' म्हणून प्रसिद्ध झालेली आणि आता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटात 'उल्फत'ची छोटी पण दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन पुन्हा एकदा चर्चेत आहे.
advertisement
2/10
तिच्या सुंदरतेची आणि अभिनयाची चर्चा होत असताना, तिच्या खासगी आयुष्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटना नुकतीच समोर आली आहे.
advertisement
3/10
४१ वर्षीय सौम्या टंडनचा जन्म भोपाळमध्ये झाला असला तरी तिचे बालपण उज्जैनमध्ये गेले. तिच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी तिने काम सुरू केले आणि येथूनच तिचा मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू झाला.
advertisement
4/10
२००६ मध्ये 'फेमिना कव्हर गर्ल' बनल्यानंतर सौम्या मॉडेलिंग आणि नंतर टीव्हीकडे वळली. तिने 'डान्स इंडिया डान्स'चे तीन सीझन आणि शाहरुख खानसोबत 'जोर का झटका: टोटल वाईपआऊट' शोचे होस्टिंग केले. 'जब वी मेट' मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले, मात्र २०१५ मध्ये 'भाभीजी घर पर हैं' मधून तिला खरी प्रसिद्धी मिळाली.
advertisement
5/10
ऑगस्ट २०२० मध्ये 'भाभीजी घर पर हैं' सोडल्यानंतर तिने चित्रपटांकडे लक्ष दिले. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाची पत्नी 'उल्फत'च्या भूमिकेत तिने दमदार काम केले, ज्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
advertisement
6/10
एका मुलाखतीत सौम्या टंडनने उज्जैनमधील तिच्या शालेय जीवनातील एक भयानक अनुभव शेअर केला. हा अनुभव ऐकून तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
advertisement
7/10
सौम्या म्हणाली, “मी ११ व्या इयत्तेत असतानाची गोष्ट आहे. थंडीच्या दिवसांत रात्री मी एकटी घरी परतत होते, तेव्हा एका माणसाने अचानक माझ्यासमोर बाईक थांबवली.”
advertisement
8/10
ती पुढे म्हणाली, "त्या तरुणाने बाईक थांबवून, माझ्या कपाळावर जबरदस्तीने सिंदूर लावले! त्या घटनेने मी खूप घाबरले होते." या घटनेनंतर सौम्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. एक मुलगी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना होणारा हा त्रास तिने अनुभवला आहे.
advertisement
9/10
सौम्या टंडनने तिचे खासगी आयुष्य नेहमीच गुप्त ठेवले. एका दशकाहून अधिक काळ डेट केल्यानंतर तिने २०१६ मध्ये तिचा बॉयफ्रेंड सौरभ जैन याच्याशी लग्न केले.
advertisement
10/10
तिने तिच्या लग्नाची सार्वजनिकरित्या कधीही पुष्टी केली नाही, कारण तिला तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचे होते. १४ जानेवारी २०१९ रोजी सौम्याला मुलगा झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar: अक्षय खन्नाच्या 'उल्फत'सोबत 17 व्या वर्षी घडलेली भयानक घटना! बाईकवाल्याने एकटीला गाठलं अन्....