TRENDING:

Ranveer Singh : 'धुरंधर' रणवीर सिंगकडून मोठा 'गुन्हा', होतोय पश्चाताप; देवाचा धावा

Last Updated:
Ranveer Singh : सध्या धुरंधर 2 मुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंगकडून आधी मोठी चूक घडली आहे. त्याचा त्याला पश्चातप झाला आणि त्याने माफीही मागितली. पण आता तो देवाच्या चरणी जाणार आहे.
advertisement
1/7
Ranveer Singh : 'धुरंधर' रणवीर सिंगकडून मोठा 'गुन्हा', होतोय पश्चाताप; देवाचा धावा
अभिनेता रणवीर सिंग सध्या धुरंधर फिल्ममुळे चांगलाच चर्चेत आहे. पण आता मात्र तो आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरच्या हातून मोठी चूक झाली आहे, त्याचा पश्चाताप त्याला होतो आहे. यासाठी त्याने आधी माफी मागितली आहे पण आता तो देवीच्या चरणी धाव घेणार आहे.
advertisement
2/7
2025 मधील हे प्रकरण आहे. गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल झालं. जिथं रणवीरने एका फिल्ममधील अभिनेत्याच्या अभिनयाची नक्कल केली होती आणि पवित्र देवतेचा उल्लेख केला होता. यामुळे तो वादात सापडला.
advertisement
3/7
ही फिल्म म्हणजे कांतार : चॅप्टर 1. ज्यातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची नक्कल रणवीरने केली होती आणि पवित्र देवतेचा उल्लेख भूत असा केला होता. यामुळे संपूर्ण देशभरातील हिंदू भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी रणवीरविरोधात कर्नाटकच्या बंगळुरूमधील हाय ग्राऊंड्स पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
advertisement
4/7
हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने रणवीरला फटकारलं होतं. "तुम्ही सुपरस्टार असाल, पण तुम्ही कायद्याच्या वर नाही आहात हे लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बोलताना आणि वावरताना सेलिब्रिटींनी जबाबदारीनंच वागायला हवं. इंटरनेट, सोशल मीडिया काहीही विसरत नाही, त्यामुळं विचार करून बोलायला हवं," असं कोर्टाने रणवीरचे कान टोचले होते.
advertisement
5/7
यानंतर रणवीरने सोशल मीडियावर माफी मागितली होती. "मला देशातील प्रत्येक संस्कृती आणि परंपरेचा आदर आहे. पण मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो", अशा आशयाची पोस्ट त्याने केली होती.
advertisement
6/7
पण तक्रारदाराने रणवीरची ही माफी स्वीकारली नाही. ती दिखाऊ असल्याचं म्हटलं. अपमान तोंडी केला असेल, तर माफीही तशीच असायला हवी, असा युक्तिवाद तक्रारदाराच्या वकिलांनी केला.
advertisement
7/7
याबाबत रणवीरच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. रणवीरला आपल्या चुकीबद्दल मनापासून पश्चात्ताप होत आहे. याबाबत तो कोर्टात सादर करणार आहे. तो स्वतः म्हैसूर इथल्या चामुंडी हिल्सवर जाऊन देवीचं दर्शन घेईल आणि माफी मागेल, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ranveer Singh : 'धुरंधर' रणवीर सिंगकडून मोठा 'गुन्हा', होतोय पश्चाताप; देवाचा धावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल