भावाला ओवाळताना बॅकग्राऊंडला वाजवा ही गाणी; चौथं ऐकून येईल डोळ्यात पाणी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bhai Dooj 2025 : भाऊबीजेला बॉलिवूडची काही गाणी प्रत्येक भावा-बहिणीने न चुकता ऐकायलाच हवी.
advertisement
1/5

फूलों का तारों का : 'हरे राम हरे कृष्णा' या 1971 मधील चित्रपटातील 'फूलों का तारों का' हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जादुई आवाजातील हे गाणं भावा-बहिणीचं प्रेम दर्शवतं. या गाण्याचे बोल आणि मधुर संगीत प्रत्येकाला भावूक करतं.
advertisement
2/5
मेरे भैया-मेरा चंदा : 'काजल' या 1965 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील 'मेरे भैया, मेरे चंदा' हे गाणं बहिणीला असलेलं भावाबद्दलचं प्रेम दर्शवतं. रवि जी यांनी संगीतबद्ध केलेलं गहे गाणं आशा भोसले यांनी आपल्या मधूर आवाजात गायलं आहे.
advertisement
3/5
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया : 'सच्चा झूठा' या चित्रपटातील 'मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया' हे गाणं एका भावाचं आपल्या बहिणीवर असलेलं प्रेम दर्शवणारं आहे. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं खूपच कमाल आहे. या गाण्यात राजेश खन्ना दिसून येतात.
advertisement
4/5
भाई-बहन का प्यार : 'फरिश्ते' या 1991 मध्ये आलेल्या चित्रपटातील 'भाई-बहन का प्यार' या गाण्यात मस्ती आणि प्रेम दाखवण्यात आलं आहे. मोहम्मद अजीज, अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणं गायलं आहे. आनंद बख्शी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून बप्पी लहरी यांनी संगीत दिलं आहे.
advertisement
5/5
बहन-ओ-बहना : अर्जुनचं हे गाणं भावा-बहिणीच्या गोड नात्याची झलक दाखवतं. मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गाणं बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि राधिकाची केमिस्ट्री पाहायला मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भावाला ओवाळताना बॅकग्राऊंडला वाजवा ही गाणी; चौथं ऐकून येईल डोळ्यात पाणी