TRENDING:
महापालिकेला कोणाला वोट द्यायचं नाही? तेजस्विनी पंडितने सांगूनच टाकलं, शेअर केली जळजळीत पोस्ट
Last Updated:
Municipal Corporation Election: ५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी राजकारण तापलेलं असतानाच, आता सिनेसृष्टीतील कलाकारांनीही एक जागरूक नागरिक म्हणून मैदानात उडी घेतली आहे.
advertisement
1/8
महापालिकेला कोणाला वोट द्यायचं नाही? तेजस्विनी पंडितने सांगूनच टाकलं
मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी राजकारण तापलेलं असतानाच, आता सिनेसृष्टीतील कलाकारांनीही एक जागरूक नागरिक म्हणून मैदानात उडी घेतली आहे.
advertisement
2/8
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर एक रोकठोक पोस्ट शेअर करत मतदारांना विचार करायला भाग पाडलं आहे. "निवडणूक फक्त एका दिवसाची नसते, ती पुढील पाच वर्षांच्या नशिबाचा कौल असते," असा संदेश तिने आपल्या पोस्टमधून दिला आहे.
advertisement
3/8
आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनीने मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
4/8
advertisement
5/8
तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, 'वोटर अवेयरनेस'साठी तिने उचललेल्या या पावलाचे कौतुक होत आहे.
advertisement
6/8
या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे '४ सदस्यीय प्रभाग रचना'. अनेक मतदारांना वाटतं की आपण फक्त एका उमेदवाराला मत देऊन बाहेर पडू शकतो, पण इथेच चूक होऊ शकते. प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागातील 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' अशा चारही जागांसाठी मतदान करावे लागणार आहे.
advertisement
7/8
ईव्हीएम (EVM) मशीनवर चारही जागांच्या उमेदवारांसमोरचे बटण दाबल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. जर तुम्ही चारही जागांसाठी मतदान केले नाही, तर तुमचे मत तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते.
advertisement
8/8
त्यामुळे, प्रत्येक जागेसाठी तुमच्या पसंतीचा उमेदवार निवडा. जर तुम्हाला कोणत्याही जागेवरील उमेदवार योग्य वाटत नसेल, तर तुम्ही 'नोटा'चे बटण दाबू शकता, पण बटण दाबणे अनिवार्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महापालिकेला कोणाला वोट द्यायचं नाही? तेजस्विनी पंडितने सांगूनच टाकलं, शेअर केली जळजळीत पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल