TRENDING:

प्रसिद्ध सिंगरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? ऑस्ट्रेलिअन GF चे गंभीर आरोप, पत्नीची 'ती' पोस्ट चर्चेत!

Last Updated:
Bollywood Controversy: घराघरांत लोकप्रिय झालेल्या या गायकावर एकामागून एक दोन विदेशी तरुणींनी फसवणुकीचे आणि प्रेमात धोका दिल्याचा आरोप केला आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध सिंगरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? ऑस्ट्रेलिअन GF चे गंभीर आरोप
मुंबई: 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' या गाण्याने साऱ्या जगाला नाचवणारा पंजाबी रॉकस्टार करण औजला सध्या एका संकटात सापडला आहे. घराघरांत लोकप्रिय झालेल्या या गायकावर एकामागून एक दोन विदेशी तरुणींनी फसवणुकीचे आणि प्रेमात धोका दिल्याचा आरोप केला आहे.
advertisement
2/7
एकीकडे सोशल मीडियावर या आरोपांमुळे वादळ उठलं असताना, करणची पत्नी पलक औजला हिने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
advertisement
3/7
सर्वात आधी कॅनडातील 'Ms Gori' नावाच्या एका महिला आर्टिस्टने करण औजलावर गंभीर आरोप केले. तिचं म्हणणं आहे की, करणने आपलं लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जवळीक साधली आणि तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा तिला त्याच्या लग्नाबद्दल समजलं, तेव्हा तिला धमक्या देण्यात आल्या आणि तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा तिने केला आहे.
advertisement
4/7
हे प्रकरण शांत होतं न होतं तोच, ऑस्ट्रेलियातून 'Dj Swan Musik' नावाने प्रसिद्ध असलेल्या एका मिस्ट्री गर्लने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली. तिचं म्हणणं आहे की, करण तिला पर्सनल मेसेज करत होता. तिने त्याला धोकेबाज म्हणत आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचंही ठणकावून सांगितलं आहे.
advertisement
5/7
या सर्व आरोपांवर करण औजलाने अद्याप मौन बाळगलं असलं, तरी त्याची पत्नी पलक मात्र पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं दिसत आहे. पलकने इन्स्टाग्रामवर एका इव्हेंटमधील अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पांढऱ्या सूटमधील करणच्या गालावर पलक प्रेमाने किस करताना दिसत आहे.
advertisement
6/7
विशेष म्हणजे, या फोटोच्या बॅकग्राउंडला तिने करणचंच 'विनिंग स्पीच' हे गाणं लावलं आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, पलकने शब्दांशिवाय या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. "काहीही झालं तरी मी माझ्या पतीसोबत आहे," असाच संदेश तिने या पोस्टमधून दिल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
करण औजला हा सध्याच्या घडीचा सर्वात यशस्वी पंजाबी रॅपर आणि गायक आहे. 'विनिंग स्पीच', 'तौबा तौबा' आणि 'सॉफ्टली' यांसारख्या गाण्यांमुळे त्याने जगभर नाव कमावलं आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच त्याच्यावर झालेल्या या कॅरेक्टरवरील आरोपांमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध सिंगरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? ऑस्ट्रेलिअन GF चे गंभीर आरोप, पत्नीची 'ती' पोस्ट चर्चेत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल