TRENDING:

पुढल्या वर्षी दोनाचे चार हात होणार! सुचित्राला ठेवायचं होतं सीक्रेट, पण सोहमने आईबाबांसमोरच दिली लग्नाची कबुली

Last Updated:
Soham Bandekar Wedding : आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलगा सोहम बांदेकरच्या लग्नाची चर्चा आहे. बांदेकर कुटुंबात लवकरच नव्या सदस्याचा प्रवेश होणार.
advertisement
1/8
सुचित्राला ठेवायचं होतं सीक्रेट, पण सोहमने आईबाबांसमोरच दिली लग्नाची कबुली!
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
advertisement
2/8
काही दिवसांपूर्वी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या बातमीनंतर आदेश बांदेकर आता सासरे होणार म्हणून त्यांचे चाहतेही अतिशय उत्साहात आहेत.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी लेक सोहम बांदेकरच्या लग्नाबाबतही अनेक गोष्टींचा खुलासा केला.
advertisement
4/8
त्यांनी होणाऱ्या सुनेचं नाव स्पष्ट केलं नसलं तरीही राजश्री मराठीच्या एका पोस्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार त्यांची होणारी सून ही अभिनेत्री पूजा बिरारी आहे. तथापि, अद्याप सोहम किंवा पूजा यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
advertisement
5/8
नुकतंच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशातच आदेश बांदेकर यांच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे. एका मुलाखतीत आदेश आणि सुचित्रा यांनी बांदेकरांच्या गणपतीच्या परंपरेबाबत सविस्तर माहिती दिली.
advertisement
6/8
यावेळी पत्रकाराने सुचित्रा यांना सोहमच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. 'पुढच्या वर्षी नवी व्यक्ती गणपती बाप्पाची पूजा करताना दिसणार का?', असा प्रश्न विचारताच सुचित्रा बांदेकर यांनी 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत या विषयाला बगल दिली.
advertisement
7/8
अशातच सोहमने मात्र यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. सोहम म्हणाला, "मी स्वीकारतही नाही, आणि मी नकारही देत नाही. बाप्पाच्या आणि आपल्या सर्वांच्याच मनात जे असेल तेच होईल. लवकरच तुम्हाला दिसेल की बाप्पाच्या सेवेसाठी माझ्या दोन हातांसोबत आणखी दोन हात जोडले जातील असं मी तुम्हाला सांगतो."
advertisement
8/8
सोहमच्या या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय की बांदेकर कुटुंबात लवकरच नव्या सदस्याचा प्रवेश होणार आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं प्रमोशन होणार असून लवकरच ते सासू-सासऱ्यांच्या भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुढल्या वर्षी दोनाचे चार हात होणार! सुचित्राला ठेवायचं होतं सीक्रेट, पण सोहमने आईबाबांसमोरच दिली लग्नाची कबुली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल