देशमुखांची सून, मराठी बोलते पण खायला आवडतं काय? जेनिलियाचं फेव्हरेट फूड कोणतं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Genelia Deshmukh Favourite Food : जेनिलिया देशमुख आपल्या डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घेते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखच्या पत्नीला महाराष्ट्रीयन फूड प्रचंड आवडतं.
advertisement
1/7

जेनिलिया देशमुख फिटनेससाठी ओळखली जाते. रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख काही वर्षांपूर्वी पूर्णपणे शाकाहारी झाले आहेत. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जेनिलिया आपल्या आहारात प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश करते.
advertisement
2/7
रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर जेनिलिया महाराष्ट्रीयन परंपरा जपतना दिसून येते. पारंपारिक सणदेखील मोठ्या उत्साहात कुटुंबियांसमवेत ती साजरे करते. लग्नानंतर तिने सासू आणि देशमुख कुटुंबातील मंडळींकडून मराठी सणवारांबद्दल जाणून घेतलं आहे.
advertisement
3/7
जेनिलिया देशमुख उत्तम मराठी बोलते. तसेच महाराष्ट्रीयन जेवणदेखील बनवते. काही दिवसांपूर्वी जेनिलियाने एका मुलाखतीत आपल्या आवडत्या पदार्थांबद्दल आणि जेवण बनवण्याच्या पद्धतीबद्दल भाष्य केलं होतं.
advertisement
4/7
रितेश देशमुखसोबत संसार थाटल्यानंतर जेनिलिया चित्रपटसृष्टीपासून दूर होती. त्यावेळी कुटुंब, संसार या गोष्टींकडे तिने लक्ष दिलं. जेनिलियाच्या एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला की, सासूबाईंकडून कोणता पदार्थ बनवायला शिकली आहेस?". याचं उत्तर देत जेनिलिया म्हणाली,"भाकरी, पिठलं आणि ठेचा".
advertisement
5/7
जेनिलिया पुढे म्हणाली,"मला ठेचा, भाकरी, पिठलं खूपच आवडतं. माझ्या सासूबाई दर गुरुवारी पिठलं, भाकरी आणि ठेचा बनवतात. हे जेवण मला भयंकर आवडतं".
advertisement
6/7
जेनिलियाचं पिठलं-भाकरी हे फेव्हरेट फूड आहे. जेनिलिया आपल्या आरोग्याची काळजी घेते. पिठल्यामध्ये प्रोटिन जास्त असतं. त्यामुळे पिठलं मला खूप आवडतं. पिठलं बनवताना मी तेज अजिबात वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये जेवण बनवते. कारण त्यात तेल असतं".
advertisement
7/7
जेनिलियाला पुरणपोळी प्रचंड आवडते. तुमच्या तिच्या आवडीच्या पदार्थांमध्ये पुरणपोळीचा समावेश हमखास होतो. जेनिलियाप्रमाणे रितेशलाही पुरणपोळी खूप आवडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
देशमुखांची सून, मराठी बोलते पण खायला आवडतं काय? जेनिलियाचं फेव्हरेट फूड कोणतं?