Ashes Test : जो रूटने घरात घुसून मारलं, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठा पराक्रम, कांगारुंची बोलती बंद केली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बहुचर्चित अॅशेस स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गाबाच्या मैदानावर दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने मोठा पराक्रम केला आहे.
advertisement
1/6

2/6
गेल्या साधारण दशकभरात जो रूटला ऑस्ट्रेलियन भूमीवर जे जमलं नव्हतं, ते आज जो रूटने करून दाखवलं आहे.
advertisement
3/6
खरं तर जो रूटने आतापर्यंत सर्वच देशात शतक ठोकलं आहे. पण ऑस्ट्रेलियन भुमीवर त्याला एकदाही शतक ठोकता आले नव्हते.
advertisement
4/6
जो रूटची ही दुखती नसं पकडून ऑस्ट्रेलियन मिडिया त्याला नेहमी डिवचायची. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर अनेकदा असे प्रकार घडले आहेत.
advertisement
5/6
अखेर आज त्याने या सगळ्या ट्रोलर्सना अॅशेसच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शतक ठोकून उत्तर दिले आहे. जो रूटने 181 बॉलमध्ये हे शतक ठोकलं होतं. या खेळीत त्याने 12 खणखणीत चौकार मारले आहेत.
advertisement
6/6
जो रूटच्या या शतकाच्या बळावर दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा डाव 250 पार गेला आहे आणि सध्या ऑल आऊटच्या उंबरठ्यावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ashes Test : जो रूटने घरात घुसून मारलं, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठा पराक्रम, कांगारुंची बोलती बंद केली