TRENDING:

तीन वर्षे सलग TRP मध्ये टॉप! 'ठरलं तर मग' मालिकेबाबत मोठी अपडेट, ती काय?

Last Updated:
ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून TRP मध्ये नंबर वन आहे. काय आहे मालिकेबाबतची महत्त्वाची अपडेट.
advertisement
1/8
तीन वर्षे सलग TRP मध्ये टॉप!  'ठरलं तर मग' मालिकेबाबत मोठी अपडेट, ती काय?
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करतेय. सायली आणि अर्जुनची ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करायला कुठेच कमी पडले नाही. मालिका सुरू झाल्यापासून TRP च्या शर्यतीत कायम नंबर वनवर आहे. मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. 
advertisement
2/8
मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन महिपतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.
advertisement
3/8
याच नोटवर मालिकेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या निमित्तानं बोलताना अभिनेत्री जुई गडकरीनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, "आपल्या नवीन मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा येतो तेव्हा पोटात जो गोळा येतो तसाच आजही येतो. जी मालिका मला माझ्या आजारपणानंतर मिळाली ती यशस्वी होणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. सलग तीन वर्ष बऱ्याच प्रोजेक्टला नाही म्हणत होते. का कोण जाणे पण मनातून ती प्रोजेक्ट्स करावीशी वाटत नव्हती."
advertisement
4/8
"ते म्हणतात ना मनातून होकार यावा लागतो..अशा कामाची वाट बघत होते.. देवाला सतत सांगत होते माझी दमछाक होईल असा प्रोजेक्ट दे.. एकवेळ पैसे कमी चालतील पण माणसं चांगली दे.. काम चांगलं दे.. घरी जाताना एक समाधान वाटलं पाहिजे असं काम दे.. आणि देवाने अगदी तसंच केलं! काम तर सुंदर दिलंच.. पैसा दिलाच.. माझं पहिलं अवॉर्ड दिलंच, पण ज्यांच्या बरोबर रोज इतके तास घालवायचे, काम करायचं ती माणसंही चांगली दिली."
advertisement
5/8
गेली 3 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ठरलं तर मग मालिकेबाबत महत्त्वाची अपडेट म्हणजे मालिकेनं तब्बल 1000 भागांचा टप्पा पार केला आहे. याबाबत जुई म्हणाली, "आत्ताच्या काळात चांगले निर्माते मिळणं, कामाचा मोबदला चांगला मिळणं. मुळात वेळच्यावेळी मिळणं एकही रुपया कमी न पडता ही खूप मोठी गोष्टं आहे. त्याशिवाय स्टार प्रवाहसारखी एक चांगली वाहिनी मिळणं आणि चांगली मालिका मिळणं जी 1000 चा टप्पा गाठेल ही त्याहुन मोठी गोष्ट."
advertisement
6/8
"आज आमच्या या लाडक्या बाळाचे 'ठरलं तर मग'चे 1000  भाग पूर्ण होत आहेत!! आमच्या या बाळाला तुम्ही इतकं प्रेम देताय हे बघून मन खुप भरुन येतंय. 1000 भाग होऊनही तुमचं प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही.. उलट प्रत्येक भागागणिक वाढतंय हे बघून आम्हा सगळ्यांनाच, कितीही थकलो, कितीही महासंगम केले तरी नवी ऊर्जा मिळते. आमची सगळीच टीम पोटतिडकिने कामं करतात. कुठल्याच डिपार्टमेंटचा माणूस कुठल्याही इतर डिपार्टमेंटचं काम करायला नकार देत नाही."
advertisement
7/8
मालिकेची टीमकडून जुईला प्रचंड सपोर्ट मिळतो. त्याविषयी बोलताना तिनं सांगितलं, "माझ्या तब्बेतीच्या कुरबुरी दरवेळी सांभाळून घेणाऱ्या सगळ्यांचे आभार. आज मन भरुन कौतुक करावसं वाटतंय ते माझ्या स्पॅाट टीमचं! मी कितीला येणार आहे त्यानुसार माझ्यासाठी जेवण, नाश्ता काढून ठेवणं ते गोळ्या घेतल्या का? याची आठवण करुन देणं! मी जेवले नाही तर मला दामटवणं, आराम करायला सांगणं, काळजी घेणं हे केवळ काम म्हणून न करता मनापासून सगळं करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."
advertisement
8/8
"सकाळी अर्धवट झोपेत जेव्हा मी सेटवर येते तेव्हा युनीटचे प्रसन्न चेहरे बघून मला ऊर्जा मिळते. ही सगळी चांगली माणसं देवाचीच भेट आहेत. आणि आजचा योग बघा! ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतंय त्या माझ्या दत्त महाराजांची आज दत्त जयंती. याहून मोठा आशिर्वाद काय असेल. माझ्याकडून चांगलं काम होत राहो हीच महाराजांकडे प्रार्थना. प्रेक्षकांचे खूप खूप आभार."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तीन वर्षे सलग TRP मध्ये टॉप! 'ठरलं तर मग' मालिकेबाबत मोठी अपडेट, ती काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल