
मोबाईल चोरीचे प्रमाण सध्या वाढलंय. मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो. याबाबत नेमकं काय करावं याची माहिती डोंबिवलीविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलीय.