TRENDING:

लिंबू कलरची साडी अन् कुरळे केस, गिरिजाला पाहून तुम्हीही म्हणाला, नको करू सखी असा साजिरा श्रृंगार..!

Last Updated:
Girija Oak : अभिनेत्री गिरीजा ओकचं नवं फोटोशूट पुन्हा चर्चेत आलं आहे. निळ्या साडीनंतर गिरिजानं लिंबू कलरच्या साडीत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/9
लिंबू कलरची साडी अन् कुरळे केस,गिरिजाला पाहून तुम्हीही म्हणाला, 'नको करू सखी...'
नॅशनल क्रश गिरीजा ओक सध्या चर्चेत आहे. एका निळ्या साडीनं गिरीजा ओकला एका रात्रीत नॅशनल क्रश बनवलं. तिची निळी साडी आणि सिंपल लुक देशभरात व्हायरल झाला. नॅशनल क्रश झाल्यापासून सोशल मीडियावर फक्त गिरीज ओकची चर्चा पाहायला मिळतेय.
advertisement
2/9
नॅशनल क्रश झाल्याच्या निमित्तानं गिरीजा ओकची अनेक जुनी काम देखील लोक पाहू लागले आहेत. तिची फॅनफॉलोविंग चांगलीच वाढली आहे.
advertisement
3/9
गिरीजा देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने अनेक पॉडकास्ट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तिचं एक हिंदी नाटक देखील रंगभूमीवर सुरू आहे. आपल्या कामाचे अपडेट्स देण्यासाठी गिरीजा सोशल मीडियावर सक्रीय असते.
advertisement
4/9
फक्त कामाचे अपडेट्स नाही तर गिरीजा ओक सोशल मीडियावर तिचे साडीतील हटके फोटो देखील शेअर करत असते. निळी साडी व्हायरल झाल्यानंतर गिरीजा ओकच्या साड्यांवर सगळ्याच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
advertisement
5/9
गिरीजानं नुकतंच एका सुंदर साडीत फोटोशूट केलं आहे. गिरीजाचा एक नवा लुक यानिमित्तानं पाहायला मिळाला.
advertisement
6/9
गिरीजानं लिंबू कलरची साडी नेसली आहे. लिंबू कलरच्या साडीला व्हाइट कलरची बॉर्डर आहे. त्यावर सुंदर फुलांची नक्षी आहे.
advertisement
7/9
गिरिजानं लिंबू कलरची साडी नेसत मोकळे सोडलेले तिचे कुरळे केस तिच्यावर खुपच खुलून दिसत आहेत. गिरिजा नॅशनल क्रश का झाली याचं एक उत्तम उदाहरण तिच्या फोटोशूटमध्ये मिळतंय.
advertisement
8/9
गिरिजाच्या या स्वीट अँड सिंपल लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय. नको करू सखी असा साजिरा श्रृंगार असं गिरिजाच्या व्हिडीओ आणि फोटोंच्या मागे वाजत आहे. गिरिजाला पाहून कोणीही हेच गाणं गुणगुणेल याच काही शंका नाही.
advertisement
9/9
गिरीजा ओकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती सध्या 'माय नेम इज गौहर खान' या हिंदी नाटकात काम करतेय. अभिनेत्री नीना कुळकर्णी तिच्यासोबत यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तिची 'परफेक्ट फॅमिली' ही सीरिज देखील रिलीज झाली आहे. 'ठकिशी संवाद' या मराठी नाटकातही ती काम करतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लिंबू कलरची साडी अन् कुरळे केस, गिरिजाला पाहून तुम्हीही म्हणाला, नको करू सखी असा साजिरा श्रृंगार..!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल