शरीराच्या त्या भागावर जेट स्प्रे मारताय; धुळ्याच्या डॉक्टर म्हणाल्या, 'स्वच्छ होत नाही, होतोय उलट परिणाम'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Toilet Jet Spray Side Effects : साधी लघवी जरी केली तरी टॉयलेटमध्ये जेट स्प्रेने लघवीची ती जागा स्वच्छ करण्याची सवय कित्येकांची आहे. पण याचा दुष्परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
1/5

हल्ली बहुतेक घरांमध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे. वेस्टर्न टॉयलेट म्हणजे जेट स्प्रे आलाच. त्यामुळे साधी लघवी केली तरी बहुतेक सगळेच जण जेट स्प्रेने ती जागा स्वच्छ करतात. विशेषत: महिला. पण खरंतर जेट स्प्रेने शरीराचा तो प्रायव्हेट पार्ट स्वच्छ होत नाहीच, उलट त्याचा उलटा परिणाम होतो आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
2/5
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वल्वा म्हणजे योनीमार्गाच्या बाहेरची स्किन किंवा त्वचा हे एक सेल्फ प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे तुम्ही काही केलं नाही तरी नैसर्गिकरित्या ते स्वत:ला स्वच्छ करत असतं. ती आम्ल असते म्हणजे त्याच अॅसिडीक पीएच असतो. त्याच चांगले जंतू म्हणजे हेल्दी बॅक्टेरिया लॅक्टोबॅसेलस असतात. तिसरं म्हणजे त्याच्यावर तेलाचा अगदी पातळ थर असतो.
advertisement
3/5
योनीमार्गाची स्किन खूप पातळ असते. सारखं धुतल्याने तेथील तेलाचा पातळ थर नष्ट होतो. ती जागा कोरडी होते, खाज, जळजळ असा समस्या उद्भवतात. विशेषत: पाणी क्लोरिनेटेड असेल, त्यात क्षार असतील तर त्या स्किनवर सूज येते. ती लाल पडते, त्याच्यावर क्रॅक्स पडतात, ती दुखायला लागते.
advertisement
4/5
जर यातील पीएच लेव्हल कमी झाला तर हेल्दी बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुर्गंधी निर्माण करणारे, इन्फ्केशन करणारे बॅक्टेरिया वाढतात.
advertisement
5/5
धुळ्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आराधना भामरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
शरीराच्या त्या भागावर जेट स्प्रे मारताय; धुळ्याच्या डॉक्टर म्हणाल्या, 'स्वच्छ होत नाही, होतोय उलट परिणाम'