'त्याने माझ्या मानेपासून कंबरेपर्यंत बोट फिरवलं अन्...' गिरीजा ओकसोबत लोकलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak Local Train Experiance : गिरीजा ओकन मुंबई लोकलमधील धक्कादायक अनुभव शेअर केला. तिचा साडीतील लुक आणि किस्से सोशल मीडियावर चर्चेत असताना तिने सांगितलेला हा धक्कादायक अनुभव चर्चेत आला आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री गिरीजा ओक सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिनं सांगितलेला किस्सा आणि तिचा साडीतील सोज्वळ लुक लाखो लोकांना भावला.
advertisement
2/7
गिरीजा ओक रातोरात नॅशनल क्रश बनली. यानिमित्तानं गिरीजा ओकनी काम केलेले अनेक सिनेमे, नाटक, मालिका देखील पुन्हा चर्चेत आल्या आहेत. गिरीजाने मुलाखतीत बोलताना तिच्या आयुष्यात घडलेले अनेक चांगले वाईट प्रसंग देखील सांगितलेत.
advertisement
3/7
लोकलनं प्रवास करताना गिरीजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला होता. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत गिरीजाने घडलेला प्रकार सांगितला.
advertisement
4/7
गिरीजा म्हणाली, "मी लोकल ट्रेनमधून प्रवास करत होते. तेव्हा पाठीमागून एक मुलगा आला. मला माहिती नाही तो कुठून आला. त्याने मला चाहूलही लागू दिली नाही."
advertisement
5/7
गिरीजा पुढे म्हणाली, "तो साईटने आला असेल कदाचित. त्याने बोटाने माझ्या पाठीवर, मानेपासून ते कंबरेपर्यंत अलगद बोट फिरवलं आणि तो पटकन उलटा फिरला. त्यामुळे तो मुलगा कोण होता हे मला कळलं नाही."
advertisement
6/7
"मुंबईत लोकल ट्रेनमध्ये स्पर्श करून निघून जाणं, धक्का देणं हे सगळं खूप सर्वसामान्य आहे. आपल्याला सतत अलर्ट राहणं गरजेचं आहे", असा सल्लाही गिरीजानं दिला.
advertisement
7/7
गिरीजा मुंबईची मुलगी आहे. मुंबईत कॉलेज आणि करिअर करताना ती मुंबई लोकलने प्रवास करायची. या प्रवासातील अनेक किस्से तिने या मुलाखतीत सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याने माझ्या मानेपासून कंबरेपर्यंत बोट फिरवलं अन्...' गिरीजा ओकसोबत लोकलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार