TRENDING:

सोन्याची चैन अन् तुफान राडा! स्टार क्रिकेटरमुळे अभिनेत्रीला खावी लागली जेलची हवा, बाहेर येताच केला भांडाफोड

Last Updated:
क्रिकेट ग्राउंडवरील रोमान्स तुम्ही बरेचदा पाहिला असेल, पण सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका स्टार क्रिकेटरने एका अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई केली आहे.
advertisement
1/9
स्टार क्रिकेटरमुळे अभिनेत्रीला खावी लागली जेलची हवा, बाहेर येताच केला भांडाफोड
क्रिकेट आणि ग्लॅमरचं विश्व यांचं नातं फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आजवर अनेक क्रिकेटर आणि अभिनेत्रींच्या अफेअरच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. कित्येकांनी तर लग्नही केली आहेत. मात्र, नुकतंच समोर आलेल्या एका बातमीने खळबळ उडवली आहे.
advertisement
2/9
क्रिकेट ग्राउंडवरील रोमान्स तुम्ही बरेचदा पाहिला असेल, पण सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका स्टार क्रिकेटरने एका अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई केली आहे. श्रीलंकेचा धडाकेबाज क्रिकेटर भानुका राजपक्ष आणि अभिनेत्री हर्षी रसंगा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
advertisement
3/9
भानुका राजपक्षने एका सोन्याच्या साखळीसाठी हर्षी रसंगाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्याने अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधित अभिनेत्रीला जेलची हवा खावी लागली आहे.
advertisement
4/9
हे प्रकरण एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टसारखंच मसालेदार आहे. भानुका राजपक्षच्या तक्रारीनुसार, त्याने आपली ९ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी हर्षी रसंगाला फक्त काही काळासाठी वापरण्यासाठी दिली होती. पण हर्षीने भानुकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता, ती साखळी थेट गहाण ठेवून त्यावर पैसे उचलले.
advertisement
5/9
जेव्हा ही बाब भानुकाच्या लक्षात आली, तेव्हा त्याने तिला कायदेशीर नोटीस धाडली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हर्षीला अटक केली.
advertisement
6/9
कडुवेला दंडाधिकारी न्यायालयात जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा हर्षीने आपल्या वकिलामार्फत गुन्हा कबूल केला. तिने साखळी परत करण्याचं आश्वासनही दिलं. कोर्टाने तिला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या दोन जामिनावर मुक्त केलं.
advertisement
7/9
मात्र, जेलमधून बाहेर येताच हर्षीचे रंग बदलले. तिने सोशल मीडियावर असा दावा केला की, भानुका आणि तिचे प्रेमसंबंध होते आणि ती साखळी चोरीची किंवा तात्पुरती दिलेली नव्हती, तर भानुकाने हर्षीला ती गिफ्ट म्हणून दिली होती.
advertisement
8/9
या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार असून न्यायालयाने आता थलंगमा पोलिसांना आदेश दिले आहेत की, पुढच्या सुनावणीच्या वेळी ती सोन्याची साखळी प्रत्यक्ष कोर्टात हजर करावी.
advertisement
9/9
दरम्यान, भानुका राजपक्ष हा श्रीलंकेचा स्टार खेळाडू असून त्याने ५ वन-डे आणि ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये 'पंजाब किंग्स' कडून खेळताना तो भारतात विशेष लोकप्रिय झाला. २०२२ आणि २०२३ च्या आयपीएल सीझनमध्ये त्याने आपल्या फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सोन्याची चैन अन् तुफान राडा! स्टार क्रिकेटरमुळे अभिनेत्रीला खावी लागली जेलची हवा, बाहेर येताच केला भांडाफोड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल