TRENDING:

सोनाक्षी की मनीषा कोईराला; संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' साठी कोणी घेतलं सर्वाधिक मानधन?

Last Updated:
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली संजय लीला भन्साळींची ‘हिरामंडी’ ही वेब सिरीज सध्या तुफान चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती हैदरी सारखे कलाकार झळकले आहेत. या वेब सीरिजसाठी संजय लीला भन्साळींनी मोठमोठे सेट, शाही कपडे, दागिने या गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या मल्टीस्टारर वेब सीरिजसाठी कोणी किती मानधन घेतलं आहे, जाणून घ्या.
advertisement
1/8
सोनाक्षी की मनीषा कोईराला; ‘हिरामंडी’ साठी कोणी घेतलं सर्वाधिक मानधन?
‘हिरामंडी’ या मल्टीस्टारर वेब सीरिजसाठी कोणाला सगळ्यात जास्त तर कोणाला सगळ्यात कमी मानधन मिळालं आहे जाणून घ्या.
advertisement
2/8
या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा 'फरदीन' या भूमिकेत झळकली आहे. तिला सीरिजमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 2 कोटी मानधन मिळालं आहे.
advertisement
3/8
या मल्टीस्टारर वेब सीरिजमध्ये संजय लीला भन्साळींची भाची देखील महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे, ती म्हणजे शर्मीन सहगल. तिने आलम ही भूमिका साकारली असून तिला 35 लाख रुपये मिळाले आहेत.
advertisement
4/8
आदिती राव हैदरीने या वेब सीरिजमध्ये सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. तिला यासाठी 1 - 1.5 कोटी मानधन मिळालं आहे.
advertisement
5/8
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखने यात वहिदा ही भूमिका साकारली असून तिला 40 लाख मिळाले आहेत.
advertisement
6/8
तर या वेब सीरिजमधील सगळ्यात दिग्गज अभिनेत्री मनीषा कोईरालाने 'मल्लिकाजान' या भूमिकेसाठी 1 कोटी मानधन घेतलं आहे.
advertisement
7/8
या वेब सीरिजमध्ये रिचा चड्ढाचा रोल कमी वेळाचा असला तरी तिने यासाठी 1 कोटी मानधन घेतलं आहे.
advertisement
8/8
हिरामंडी मध्ये सगळ्यात जास्त फी सोनाक्षी सिन्हा तर सगळ्यात कमी फी शर्मीन सहगलला मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सोनाक्षी की मनीषा कोईराला; संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' साठी कोणी घेतलं सर्वाधिक मानधन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल