Cocktail मध्ये जिवंत मासा अन्... संजू बाबाच्या रेस्टॉरंटमध्ये विकला जातोय किळसवाणा पदार्थ, काय आहे नेमका प्रकार?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sanjay Dutt Restaurant Controversy: संजय दत्तच्या मुंबईतील रेस्टो-बारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून हे रेस्टॉरन्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
advertisement
1/8

मुंबई : 'धुरंधर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला संजय दत्त सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. संजय दत्तच्या मुंबईतील रेस्टो-बारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून हे रेस्टॉरन्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
advertisement
2/8
संजय दत्त आणि उद्योजक अभिमन्यू जाखड यांच्या मालकीच्या मुंबईतील 'अल्टा स्टेला' या रेस्टॉरन्टमधील संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून प्राणीप्रेमींनी या रेस्टॉरंटला चांगलंच धारेवर धरलं आहे.
advertisement
3/8
मुंबईतील 'अल्टा स्टेला' 'नक्षत्र' थीमवर आधारित रेस्टॉरंटमध्ये 'एबिसु कॉकटेल' नावाचं एक ड्रिंक सर्व्ह केलं जातं. मात्र, हे काही साधं ड्रिंक नाही. या ड्रिंकचं प्रेझेंटेशन पाहून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल.
advertisement
4/8
या कॉकटेल ड्रिंकच्या ग्लासमध्ये खालच्या बाजूला एक जिवंत बेटा फिश ठेवला जातो. इतकंच नाही, तर काही व्हिडीओमध्ये या ग्लासच्या वरच्या भागावर आगीच्या ज्वालाही दिसतात.
advertisement
5/8
केवळ आपली ड्रिंक वेगळी दिसावी आणि इन्स्टाग्रामवर रील हिट व्हावी, रेस्टॉरन्टची मार्केटिंग व्हावी यासाठी केलेला हा प्रकार पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हैद्राबादमधील एका एनजीओने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
6/8
हे प्रकरण इतकं तापलं आहे की केवळ सामान्य नागरिक नाही, तर कलाविश्वातूनही या प्रकारावर नाराजीचा स्वर ऐकू येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने देखील या प्रकरणी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
7/8
प्राण्यांच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठवणाऱ्या जॅकलीनने या अमानवीय कृत्याचा निषेध केला असून, अशा प्रकारे प्राण्यांचा छळ करणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
8/8
आपल्या युनिक थीममुळे संजय दत्तचं हे रेस्टॉरंट नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत आला आहे. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे या रेस्टॉरंटच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. तथापि. संजय दत्त आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यावर अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर 'अल्टा स्टेला'ला बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Cocktail मध्ये जिवंत मासा अन्... संजू बाबाच्या रेस्टॉरंटमध्ये विकला जातोय किळसवाणा पदार्थ, काय आहे नेमका प्रकार?