TRENDING:

आता मराठी फिल्म TVलापण नाही पाहायच्या? प्रेक्षकांचा संताप, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
Marathi Serial : मराठी मालिका आणि फिल्मचा प्रेक्षक ज्याने सोशल मीडियावर एक प्रोमो पाहून कमेंटमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
1/7
आता मराठी फिल्म TVलापण नाही पाहायच्या? प्रेक्षकांचा संताप, नेमकं प्रकरण काय?
मराठी फिल्म असो वा मालिका... याचा चाहता वर्ग कमी नाही. मराठी फिल्म आणि मराठी मालिकांप्रती प्रेक्षकांचं प्रेम वेगळंच आहे. अशाच मराठी फिल्मवर प्रेम करणारा प्रेक्षक ज्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
advertisement
2/7
सोशल मीडियावर एका मराठी मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला आहे. जो पाहिल्यावर प्रेक्षकाने संताप व्यक्त केला आहे. आता मराठी फिल्म टीव्हीलापण पाहायची नाही का? असा सवाल या प्रेक्षकाने कमेंटमध्ये विचारला आहे.
advertisement
3/7
आता नेमकं हे प्रकरण काय आहे, प्रेक्षक इतका संतप्त का झाला? असं या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलं? असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि ते जाणून घेण्याची उत्सुकताही असेल.
advertisement
4/7
तुम्ही प्रोमो पाहाल तर एका मराठी मालिकेचा हा प्रोमो आहे. जी सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता दाखवली जाणार आहे.
advertisement
5/7
ही 10 वर्षे जुनी मालिका आहे, जिचा टीआरपीही हाय होता. ही मालिका 2016 मध्ये सुरू झाली आणि 2021 ला संपली. 4 वर्षे चालणारी ही मालिका 10 वर्षांनी पुन्हा दाखवली जाणार आहे.
advertisement
6/7
माझ्या नवऱ्याची बायको... झी मराठीची ही मालिका आहे पण ती झी टॉकीजवर दाखवली जाणार, जे फिल्म्सचं चॅनेल आहे. फिल्मसाठी स्वतंत्रपणे असलेल्या चॅनेलवर मालिका दाखवली जात असल्याने प्रेक्षक भडकले आहेत.
advertisement
7/7
झी मराठीच नाही तर स्टार प्रवाहही असंच करत आहे. चॅनेल्सच्या शर्यतीत टिकण्यासाठी टीआरपी टिकवण्यासाठी झी आता स्टारला फॉलो करत असल्याच्या कमेंटही नेटिझन्सनी केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आता मराठी फिल्म TVलापण नाही पाहायच्या? प्रेक्षकांचा संताप, नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल