Bigg Boss Marathi 5 च्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? पाहा काय असणार खास बक्षीस
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचे सुपर 6 मिळाले आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा विनर मिळेल का? हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
advertisement
1/13

‘बिग बॉस मराठी 5’ चा ग्रँड फिनाले सुरू झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीचा दावेदार असणार? कोण ट्रॉफी जिंकणार या चर्चाना उधाण आलं आहे.
advertisement
2/13
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचे सुपर 6 मिळाले आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा विनर मिळेल का? हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
advertisement
3/13
निक्की तांबोळी, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतच्या नावांचा प्रचंड बोलबाला आहे. यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी उचलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
4/13
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
advertisement
5/13
‘बिग बॉस मराठी 5’ चे सुपर 6 निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालवलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर बनले आहेत.
advertisement
6/13
bigg.boss.marathi.fc या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, अंकिता प्रभु-वालावलकर आणि धनंजय पोवार यांना टॉप तीन स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात आले नाही. त्यांना फिनालेच्या काही वेळापूर्वीच शोचा निरोप घ्यावा लागला.
advertisement
7/13
त्यानुसार अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात फिनालेची स्पर्धा रंगणार आहे. यानंतर आलेल्या नव्या पोस्टमध्ये आणखी रंजक माहिती सांगण्यात आली आहे.
advertisement
8/13
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. महाचक्रव्यूह टास्कमध्ये बक्षीसाची रक्कम गमावल्याने विजेत्या सदस्याला यावर्षी झगमगत्या ट्रॉफीसह १४.६ लाख एवढी धनराशी मिळणार आहे.
advertisement
9/13
दरवर्षी फिनालेमध्ये स्पर्धकांना एक पर्याय दिला जातो. यामध्ये त्यांना बिगबॉसच्या ट्रॉफीऐवजी बक्षीस रकमेतील काही रक्कम घेऊन जाण्याची संधी दिली जाते.
advertisement
10/13
दरम्यान एका स्पर्धकाने हा पर्याय निवडून शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कोण आहे हा स्पर्धक?
advertisement
11/13
दरवर्षी फिनालेमध्ये स्पर्धकांना एक पर्याय दिला जातो. यामध्ये त्यांना बिगबॉसच्या ट्रॉफीऐवजी बक्षीस रकमेतील काही रक्कम घेऊन जाण्याची संधी दिली जाते.
advertisement
12/13
bigg.boss.marathi.fc च्या एका इन्स्टाग्राम पोस्टनुसार, जान्हवी किल्लेकरने बिगबॉसच्या ट्रॉफीऐवजी पैशाची बॅग घेऊन घराचा निरोप घेतला. या पोस्टनंतर Money Bag उचलून जान्हवीने चौथ्या क्रमांकावर या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
advertisement
13/13
टॉप 3 सदस्यांपैकी कोण आज लकी विनर ठरणार आणि त्याला काय बक्षीस मिळणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5 च्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? पाहा काय असणार खास बक्षीस