TRENDING:

'माझ्यामध्येही वासना आहेत' ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक स्टेटमेंट; होस्टही झालेली शॉक, असं काय म्हणाली?

Last Updated:
Bollywood Controversy: कधीकधी कलाकार काही मुलाखतींमध्ये असं काही वक्तव्य करून जातात, ज्याने अख्खी इंडस्ट्री हादरते. असंच एका दिग्गज अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या इच्छा आणि वासना सर्वांसमोर मोकळेपणाने मांडल्या होत्या.
advertisement
1/10
'माझ्यामध्येही वासना आहेत' ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक स्टेटमेंट; होस्टही झालेली शॉक
बॉलिवूड म्हटलं की फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही मसाला पाहायला मिळतो. अनेकदा कलाकारांचे ऑफस्क्रीन अफेअर्स, आपापसातील भांडणं आणि कॉन्ट्रोव्हर्सी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात.
advertisement
2/10
कधीकधी कलाकार काही मुलाखतींमध्ये असं काही वक्तव्य करून जातात, ज्याने अख्खी इंडस्ट्री हादरते. असंच काहीसं एका दिग्गज अभिनेत्रीसोबत घडलं होतं. तिने एका मुलाखतीत तिच्या इच्छा आणि वासना सर्वांसमोर मोकळेपणाने मांडल्या होत्या.
advertisement
3/10
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून रेखा आहेत. वयाची सत्तरी ओलांडली तरी रेखांची जादू आजही कमी झालेली नाही. मात्र, या सौंदर्याच्या पडद्यामागे एक असा बिनधास्त आणि रोखठोक स्वभाव लपलेला आहे, जो अनेकदा वादाचा विषय ठरला.
advertisement
4/10
अनेक मुलाखतींमध्ये रेखा यांनी खळबळजनक वक्तव्य केली आहेत. अशातच त्यांचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रेखा यांनी स्वतःच्या प्रतिमेला तडा जाणारं धक्कादायक वक्तव्य केलं होतं.
advertisement
5/10
सिमी गरेवाल यांच्या गाजलेल्या चॅट शोमध्ये त्यांनी रेखा यांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि प्रतिमेबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर रेखा यांचं उत्तर ऐकून खुद्द सिमीही शॉक झाल्या होत्या.
advertisement
6/10
रेखा त्यांच्या नेहमीच्याच शांत स्वरात म्हणाल्या, "मी दारू पिते, मी ड्रग्जही करते. मी स्वतःला फार पवित्र समजत नाही. माझ्यामध्येही वासना आहेत, मी काही त्या लपवत नाही."
advertisement
7/10
एका दिग्गज अभिनेत्रीने कॅमेरासमोर उघडपणे स्वतःबद्दल अशाप्रकारच्या गोष्टी बोलणे, ही त्या काळी एक मोठी गोष्ट होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या विधानाने रेखा यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, रेखा यांनी कधीही त्याची फिकीर केली नाही.
advertisement
8/10
१९५४ मध्ये जन्मलेल्या रेखांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडलं आणि १९६९ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्या कन्नड चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या.
advertisement
9/10
बॉलिवूडमध्ये आल्यावर रेखा यांनी आपल्या अभिनयानेच नाही, तर आपल्या बोल्ड भूमिकेमुळेही खळबळ उडवून दिली होती. त्या काळात रेखा यांनी बोल्ड सीन्स देण्यात कधीच संकोच केला नाही.
advertisement
10/10
रेखा यांच्या नावावर आजही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मग ते त्यांचं कोणासोबत असलेलं प्रेमप्रकरण असो किंवा एखादी कॉन्ट्रोव्हर्सी. रेखा यांनी कधीच 'आदर्श स्त्री'ची इमेज जपण्याचा प्रयत्न केला नाही. त्या नेहमीच आपल्या अटींवर आयुष्य जगत आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्यामध्येही वासना आहेत' ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक स्टेटमेंट; होस्टही झालेली शॉक, असं काय म्हणाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल