TRENDING:

IMDB TOP 10 Web Series : 'द फॅमिली मॅन 3','पंचायत 4' पडल्या मागे, ही ठरली IMDB वर 2025 ची सर्वात लोकप्रिय सीरिज

Last Updated:
advertisement
1/10
IMDB TOP 10 Web Series : ही ठरली IMDB वर 2025 ची सर्वात लोकप्रिय सीरिज
द बॅड्स ऑफ बॉलिवूड (The Bads of Bollywood) : शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानने 2025 मध्ये 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. 18 सप्टेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नेटफ्लिक्सवरील ही सीरिज 2025 मध्ये सर्वाधिक गाजली. IMDB ने शेअर केलेल्या यादीत ही सीरिज लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहे.
advertisement
2/10
ब्लॅक वॉरंट (Black Warrant) : विक्रम मोटवानीची 'ब्लॅक वॉरंट' या सीरिजला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आहे. नेटफ्लिक्सवरील ही हिंदी क्राइम ड्रामा सीरिज आहे. या सीरिजला प्रेक्षकांचे चांगले रिव्यू मिळाले आहेत.
advertisement
3/10
पाताल लोक सीझन 2 (Paatal Lok Season 2) : 'पाताल लोक' ही सुपरहिट सीरिज आहे. 2025 मध्ये या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. जयदीप अहलावत या सीरिजमध्ये हाथीराम चौधरी यांच्या भूमिकेत आहे. या क्रिमिनल सीरिजला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
advertisement
4/10
पंचायत सीझन 4 (Panchayat Season 4) : 'पंचायत'चे सर्व सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. जितेंद्र कुमारच्या या बहुचर्चित सीरिजचा चौथा सीझन 2025 मध्ये प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. फुलेरा गावातील निवडणुक या सीरिजमध्ये पाहायला मिळाली.
advertisement
5/10
मंडेला मर्डर्स (Mandala Murders) : 'मंडेला मर्डर्स' ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे. वाणी कपूरच्या या सीरिजमध्ये सस्पेन्सचा तडका पाहायला मिळतो. नेटफ्लिक्सवरील ही सीरिज IMDB च्या लोकप्रिय सीरिजच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
advertisement
6/10
खौफ (Khauf) : खौफ या प्राईम व्हिडीओवरील सीरिजमध्ये चुम दरांग, अभिषेक चौहान, गगन अरोडा ते रजत कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 2025 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात 7.4 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
7/10
स्पेशल ऑप्स सीझन 2 (Special Ops Season 2) : केके मेनन पुन्हा एकदा हिंमत सिंहच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिओ स्टारवरील ही सीरिज 2025 मधील एक लोकप्रिय सीरिज आहे.
advertisement
8/10
खाकी: द बंगाल चॅप्टर (Khakee: The Bengal Chapter) : 'खाकी: द बंगाल चॅप्टर' ही एक पीरियड पॉलिटिकल थ्रिलर सीरिज आहे. नीरज पांडे यांच्या या सीरिजमध्ये ऋत्विक भौमिक, आदिल जफर आणि चित्रांगदा सिंह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येऊ शकते.
advertisement
9/10
द फॅमिली मॅन 3 (The Family Man Season 3) : 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजमध्ये मनोज बायपेयीने आपल्या कामाने प्रेक्षकांना थक्क केलं आहे. जबरदस्त कथानक असणारी ही सस्पेन्स, थ्रिलर सीरिज आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही सीरिज ओटीटीवर नंबर 1 ट्रेंड करत आहे.
advertisement
10/10
क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर (Criminal Justice: A Family Matter) : 'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी माधव मिश्राची भूमिका साकारली आहे. लीगल ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IMDB TOP 10 Web Series : 'द फॅमिली मॅन 3','पंचायत 4' पडल्या मागे, ही ठरली IMDB वर 2025 ची सर्वात लोकप्रिय सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल