Chef Kitchen Tips : चटणी वगैरे काहीच नसेल तेव्हा...; शेफ विकास खन्ना यांनी दाखवला 1 मिनिटात सॉस कसा बनवायचा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chef Kitchen Tips 1 Minute Sauce Recipe : सॉस, चटणी झटपट बनत असली तरी एका मिनिटात बनेल असं नाही. पण शेफ विकास खन्ना यांनी एका मिनिटात सॉस तयार करून दाखवला आहे.
advertisement
1/5

भजी, पराठा वगैरे खायचा म्हटला की सोबत चटणी किंवा सॉस हवाच. पण बऱ्याचदा असं होतं की चटणी बनवायला वेळ नसतो किंवा सॉस संपलेला असतो. मग अशावेळी काय करायचं?
advertisement
2/5
शेफ विकास खन्ना यांनी एक मिनिटात सॉस बनवून दाखवला आहे. एक मिनिटात काय होतं? सॉस कसा काय बनेल? असं तुम्ही म्हणाल.
advertisement
3/5
पण शेफ विकास खन्ना यांनी खरंच एक मिनिटात सॉस बनवला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा सॉस तुम्ही चटणी वगैरे काही नसेल तेव्हा पर्याय म्हणून वापरू शकता.
advertisement
4/5
आता एक मिनिटात सॉस कसा बनवायचा? तर यासाठी तुम्हाला लागणार आहे तर तेल, हळद, मीठ साखर, ग्रीक योगर्ट, लिंबू रस (असं दही ज्यातील पाणी काढलेलं असतं, ते जाड आणि क्रिमी असतं).
advertisement
5/5
आता एका गॅसवर पॅन ठेवा. त्यात एक चमचा तेल टाका, एक चमचा हळद टाका, हळद तेलात मिक्स करून घ्या. आता थोडं थंड होऊ दे. मग यात ग्रीक योगर्ट टाकून मिक्स करा. आता लिंबू रस, मीठ आणि साखर टाकून पुन्हा मिक्स करून घ्या. क्रिमी सॉस तयार.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : चटणी वगैरे काहीच नसेल तेव्हा...; शेफ विकास खन्ना यांनी दाखवला 1 मिनिटात सॉस कसा बनवायचा