Rishab Shetty Career : तेंडुलकरांच्या नाटकातून सुरुवात, बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड; ऋषभ शेट्टीच्या मराठी चाहत्यांनाही हे माहिती नाहीये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rishab Shetty Career : 'कांतारा'मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची सुरुवात विजय तेंडुलकरांच्या नाटकापासून झाली होती. या नाटकानंतर त्याच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती.
advertisement
1/9

800 कोटींची कमाई करून संपूर्ण जगाला आपल्या कामाची दखल घ्यायला लावणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता ऋषभ शेट्टी. 'कांतारा चॅप्टर 1' या सिनेमामुळे ऋषभचं प्रचंड कौतुक होत आहे.
advertisement
2/9
ऋषभ शेट्टीमुळे कन्नड सिनेसृष्टीच्या नव्या वाटा मोकळ्या झाल्या. एका सामान्य घरातून आलेल्या ऋषभ शेट्टीनं बड्या दिग्दर्शक आणि कलाकारांना मागे टाकलं.
advertisement
3/9
पण तु्म्हाला माहिती आहे कांतारा बनवणारा हाच ऋषभ शेट्टी मराठी नाटकामुळे आपलं करिअर करू शकला. त्याने त्याच्या अभिनयाची सुरूवात विजय तेंडुलकर यांच्या नाटकातून केली होती.
advertisement
4/9
कांतारा 2च्या प्रमोशननिमित्तानं ऋषभ शेट्टी केबीसीच्या मंचावर आला होता तेव्हा त्याने त्याचा अभिनयाचा प्रवास सगळ्यांना सांगितला होता.
advertisement
5/9
अमिताभ बच्चन यांच्या संवाद साधताना ऋषभ शेट्टीने सांगितलं, "सहावीत असल्यापासून बारावीत असेपर्यंत मी लहान लहान भूमिका करायचो."
advertisement
6/9
"मी लोवर मीडल क्लास फॅमिलीतील आहे. घर, चांगलं खानदान सगळं होतं पण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती."
advertisement
7/9
"माझे वडील ज्योतिषी होते. त्यांना मदत होण्यासाठी मी लहान लहान काम करायचं ठरवलं."
advertisement
8/9
ऋषभने सांगितलं, "बंगळुरूमध्ये एका नाटकात छोटंसं काम करण्याची मला संधी मिळाली. ते मराठी नाटक होतं, घासीराम कोतवाल. ते कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून आम्ही तिथे केलं होतं."
advertisement
9/9
"त्या नाटकात मी घाशीराम कोतवालचा रोल केला होता. तेव्हा त्या रोलसाठी मला युनिव्हर्सिटीमध्ये बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rishab Shetty Career : तेंडुलकरांच्या नाटकातून सुरुवात, बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड; ऋषभ शेट्टीच्या मराठी चाहत्यांनाही हे माहिती नाहीये