ही माझी लव्हर! करण जोहरने शेअर केले Photo; रिलेशनशिपबाबत सोशल मीडियावर सगळं सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Karan Johar : रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या करण जोहरने सोशल मीडियावर सिंगल लाईफबद्दल एक विनोदी पोस्ट शेअर केली.
advertisement
1/7

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने असंख्य रोमँटिक चित्रपट बनवले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचे छाप पाडली आहे. पण रोमँटिक फिल्म बनवणारा करणची मात्र कोणती लव्ह स्टोरी का नाही, तो सिंगल का आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान करणने सोशल मीडियावर त्याच्या रिलेशनशिपबाबत सांगितलं आहे.
advertisement
2/7
करणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मिरर सेल्फी पोस्ट केल्या आहेत. ज्यात तो स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.
advertisement
3/7
एका फोटोमध्ये तो गोल्डन बटण असलेला ग्रे रंगाचा स्ट्रक्चर्ड जॅकेट घातलेला दिसतो. त्यासोबत काळी ट्राऊझर आणि लेदर बॅग आहे. दुसऱ्या फोटोत तो फर कोट, टिंटेड चष्मा आणि टोपी घातलेला दिसतो. पिंक ओव्हरकोट घालून लिफ्टमध्ये एक क्लासी पोज देतोय.
advertisement
4/7
तिसऱ्या फोटोत तो क्रीम रंगाच्या डबल-ब्रेस्टेड कोट आणि मोठ्या आकाराच्या सनग्लासेसमध्ये स्टायलिश दिसतोय.
advertisement
5/7
करणने आपल्या भावना व्यक्त केल्यात. तो म्हणाला, "हवा थंड आहे, हृदय थोडं उबदार आहे, प्रेमाचा सीझन येणार आहे. कविता साधी वाटू शकते, पण त्यामागे एक सत्य आहे. मी जास्त काही बोलणार नाही, नाहीतर तुम्ही मला वेडा म्हणाल."
advertisement
6/7
"ही फक्त एक कविता आहे. कारण सिंगल राहणं हे माझं आयुष्य आहे. मी पोझ देऊन ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. इन्स्टाग्राम माझ्या दुःखाचा आरसा बनतो. रिल्स आता माझे लव्हर बनले आहेत, ज्यातून मी दिवसरात्र स्क्रोल करतो.", असं तो सांगतो.
advertisement
7/7
करणे त्याच्या सोशल मीडिया रिल्सना त्याचं लव्हर म्हटलं आहे. या पोस्टवरून स्पष्ट होतं की करणला कधीकधी त्याच्या अविवाहित आयुष्यात एकटेपणा जाणवतो, जो तो अनेकदा हलक्याफुलक्या पद्धतीने व्यक्त करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ही माझी लव्हर! करण जोहरने शेअर केले Photo; रिलेशनशिपबाबत सोशल मीडियावर सगळं सांगितलं