TRENDING:

'Koffee With Karan'मध्ये विराट कोहलीला कधीच बोलावणार नाही, असं का म्हणाला करण जौहर?

Last Updated:
Karan Johar on Virat Kohli : करण जौहर आपल्या Koffee with Karan या कार्यक्रमासाठी विराट कोहलीला कधीच आमंत्रण देणार नाही. नुकतंच एका मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
'Koffee With Karan'मध्ये विराट कोहलीला कधीच बोलावणार नाही : करण जौहर
बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता करण जौहरचा 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन आणि प्रत्येक एपिसोड चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. आजवर या कार्यक्रमात अनेक बॉलिवूडकरांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गुपिते उघड केली आहेत. अशातच करण जौहरने 'कॉफी विथ करण'मध्ये कधीच विराट कोहली सह कोणत्याच क्रिकेटरला बोलावणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
2/7
सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत करण जौहर म्हणाला,"कॉफी विथ करण'साठी मी कधीच विराटला विचारलेलं नाही. आणि हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्या प्रकरणानंतर मी आता कोणत्याही क्रिकेटपटूला बोलवणार नाही".
advertisement
3/7
हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल 2019 मध्ये कॉफी विथ करण मध्ये आले होते. या दरम्यान हार्दिकने महिलांबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना आपली वर्जिनिटी कशी गमावली याबाबत खुलासा केला होता.
advertisement
4/7
हार्दिक म्हणाला होता की त्याने आपल्या पालकांना सांगितले होते की,“एका पार्टीत मुलींच्या ग्रुपकडे बोट दाखवून त्याने पालकांना सांगितले होते की त्याचे त्या सर्वांसोबत संबंध होते आणि त्याच्या या बोलण्यावर त्याच्या पालकांना अभिमान वाटत होता".
advertisement
5/7
हार्दिक पांड्याच्या या विधानांमुळे मोठा गदारोळ झाला होता. क्रिकेट प्रशासक समितीने (COA) हार्दिक आणि राहुल यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर हार्दिकने इंस्टाग्रामवर सार्वजनिकरीत्या माफी मागितली. मात्र तरीही BCCI ने आपल्या संविधानातील नियम 41 अंतर्गत हार्दिक आणि राहुल या दोघांनाही तात्पुरते निलंबित केले होते. त्यामुळे ते काही सामने खेळू शकले नव्हते.
advertisement
6/7
करण जौहर त्यावेळी म्हणाला होता,"मला मान्य करावं लागेल की मी स्वतःला खूप जबाबदार समजतो, कारण हा माझा शो होता आणि माझं व्यासपीठ होतं. मी त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं, त्यामुळे या शोच्या परिणामाची जबाबदारी माझीच आहे".
advertisement
7/7
करण जौहरचा 'कॉफी विथ करण'मध्ये नेहमीच बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होत असतात. आतापर्यंत या बहुचर्चित कार्यक्रमाचे 8 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'Koffee With Karan'मध्ये विराट कोहलीला कधीच बोलावणार नाही, असं का म्हणाला करण जौहर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल