Karishma Kapoor Fitness: 51 व्या वर्षी करिश्मा कपूरचा कमाल फिटनेस! लोक जी गोष्ट टाळतात, तीच खाऊन कमी केले 25 किलो वजन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Karishma Kapoor Fitness:90 च्या दशकात हिट चित्रपटांची राणी असलेली करिश्मा कपूर आजही तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग त्वचेसाठी ओळखली जाते. 51 व्या वर्षीही करिश्मा कपूर एवढी फिट कशी आणि ती काय डाएट फॉलो करते? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

90 च्या दशकात हिट चित्रपटांची राणी असलेली करिश्मा कपूर आजही तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग त्वचेसाठी ओळखली जाते. 51 व्या वर्षीही करिश्मा कपूर एवढी फिट कशी आणि ती काय डाएट फॉलो करते? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
सर्वजण आपल्या हेल्थ बाबत खूप काळजी घेत असतात. वजन वाढू नये म्हणून लोक जी गोष्ट खाण्यासाठी टाळतात तीच गोष्ट खाऊन करिश्माने वजन कमी केलं. हा पदार्थ नेमका काय आहे?
advertisement
3/7
एके काळी वाढत्या वजनामुळे करिश्माला खूप ट्रोल व्हावं लागलं होतं. मात्र, एका वेगळ्या डाएट पद्धतीमुळे तिने तब्बल 25 किलो वजन कमी केले. तिचा डाएट प्लॅन जाणून घेऊया.
advertisement
4/7
करिश्माने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वजन कमी करण्यासाठी तिने दररोज मासे करी आणि भात खाल्ले. ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटलं तरी यामुळे तिचं वजन लवकर कमी झालं.
advertisement
5/7
मासे हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत आणि भात हलका असल्याने पचायलाही सोपा आहे. तिच्या डाएटमध्ये केळी आणि सपोटा यांचाही समावेश होता. साधारणपणे ही फळं वजन वाढवतात असा समज आहे. पण खरं म्हणजे या फळांमध्ये फायबर भरपूर असतं. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.
advertisement
6/7
करिश्माने स्पष्ट केलं की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे कोणताही डाएट फॉलो करण्यापूर्वी आहारतज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आज करिश्मा 50 पार असूनही तिचा फिटनेस अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देतो.
advertisement
7/7
ती योगा, डान्स आणि हेल्दी फूडला प्राधान्य देते. तिच्या सोशल मीडियावरही ती फिटनेससंबंधी टिप्स शेअर करताना दिसते. करिश्मा आजही फिट अॅंड फाइन असून चाहते आजही तिच्यावर फिदा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Karishma Kapoor Fitness: 51 व्या वर्षी करिश्मा कपूरचा कमाल फिटनेस! लोक जी गोष्ट टाळतात, तीच खाऊन कमी केले 25 किलो वजन