Toxic Film : 'KGF' स्टार यशचा नवीन सिनेमा टॉक्सिकचा टीझर वादात; 'त्या' एका सीनमुळे अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यशचे चाहते त्याच्या दमदार ॲक्शन आणि डायलॉगची वाट पाहत होते. टीझरमध्ये यशचा रांगडा अंदाज दिसला खरा, पण त्यातील एका 'इंटीमेट' (Intimate Scene) सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
advertisement
1/7

चित्रपट हे समाजाचा आरसा असतात असं म्हटलं जातं, पण कधीकधी हाच आरसा वादाचे केंद्र बनतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात एखादा टीझर किंवा ट्रेलर रिलीज झाला की, काही मिनिटांतच त्यासंबंध लोक आपआपले व्ह्यू किंवा रिव्ह्यू देऊ लागतात. दाक्षिणात्य सुपरस्टार यश, ज्याने 'रॉकी भाई' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic) या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. मात्र, नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आणि आनंदाच्या वातावरणाऐवजी वादाचं वादळ उभं राहिलं आहे.
advertisement
2/7
यशचे चाहते त्याच्या दमदार ॲक्शन आणि डायलॉगची वाट पाहत होते. टीझरमध्ये यशचा रांगडा अंदाज दिसला खरा, पण त्यातील एका 'इंटीमेट' (Intimate Scene) सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारच्या आत चित्रित करण्यात आलेल्या या काही सेकंदांच्या दृश्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी दोन गटांत विभागले गेले आहेत. अनेकांनी हा सीन अश्लील असल्याचे म्हणत यशच्या इमेजला तो साजेसा नसल्याची देखील टीका केली आहे.
advertisement
3/7
या वादाचा सर्वात मोठा फटका टीझरमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीला बसला आहे. या अभिनेत्रीचे नाव बेहाट्रिज तौफेनबाख (Behatriz Taufenbach) असल्याचे समोर आले आहे, जी एक ब्राझीलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. निगेटिव्ह कमेंट्स आणि वाढता दबाव सहन न झाल्यामुळे अखेर बेहाट्रिजने तिचे इंस्टाग्राम अकाऊंटच डिलीट किंवा डीअॅक्टिव्हेट केले आहे. सध्या तिचे प्रोफाईल सर्च केल्यास 'पेज नॉट फाऊंड' असा मेसेज येत आहे.
advertisement
4/7
सुरुवातीला या अभिनेत्रीबद्दल बराच गोंधळ होता. अनेक रिपोर्टमध्ये ही महिला 'नेटली बर्न' असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, चित्रपटाच्या दिग्दर्शिका गीता मोहनदास यांनी या चर्चांना पूर्णविराम देत बेहाट्रिजचे नाव आणि फोटो शेअर केले.
advertisement
5/7
हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाही. आम आदमी पार्टीच्या महिला विंगने या टीझरविरोधात कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हा सीन महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारा आणि अश्लील असल्याचे सांगत टीझर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
advertisement
6/7
यशच्या प्रतिमेला धक्का?'केजीएफ'च्या अफाट यशानंतर यश हा केवळ साऊथचा नाही तर संपूर्ण भारताचा लाडका स्टार बनला आहे. अशा वेळी त्याच्या सिनेमात अशा प्रकारचे बोल्ड सीन्स असणे त्याच्या चाहत्यांना रुचलेले दिसत नाही. दुसरीकडे, हा चित्रपट 'ग्रोन-अप्स' (प्रौढांसाठी) असल्याचा उल्लेख नावामध्येच असल्याने अशा सीन्सची शक्यता होती, असंही काहींचं मत आहे.
advertisement
7/7
सिनेमाच्या नावाप्रमाणेच हा वाद सध्या 'टॉक्सिक' ठरताना दिसत आहे. आता या वादावर खुद्द सुपरस्टार यश किंवा चित्रपटाची टीम काय स्पष्टीकरण देणार आणि हा सीन चित्रपटात राहणार की कात्री लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Toxic Film : 'KGF' स्टार यशचा नवीन सिनेमा टॉक्सिकचा टीझर वादात; 'त्या' एका सीनमुळे अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल