सलग तीन आठवडे हाऊसफुल्लचा बोर्ड! 'क्रांतिज्योती विद्यालय'ची छप्परफाड कमाई, 'दशावतार'चा रेकॉर्ड मोडणार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Krantijyoti Vidyalay- Marathi Madhyam Collection : क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम सिनेमाने 23 दिवसांत दमदार कमाई केली आहे. ही 'दशावतार'चा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
1/9

'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 1 जानेवारी रोजी रिलीज झालेला हा सिनेमा सलग तीन आठवडे फाऊसफुल आहे.
advertisement
2/9
सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या 23 व्या दिवशी या सिनेमानं मोठी कमाई केली आहे. हा सिनेमा दशावतार सिनेमा मागे टाकेल यात काही शंका नाही.
advertisement
3/9
मराठी माध्यमातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा विषय यामुळे क्रांतिज्योती विद्यालयने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात सिनेमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
4/9
तीन आठवड्यात सिनेमाने दशावतार सिनेमाला तगडी फाइट दिली आहे. दशावतार सिनेमाने एकूण 28 कोटींची कमाई केली आहे. दशावताराचा रेकॉर्ड क्रांतिज्योती विद्यालय मोडणार असं दिसतंय. क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाच्या कमाईचा सध्याचा वेग पाहता हा टप्पा गाठणं अशक्य वाटत नाही.
advertisement
5/9
क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम या सिनेमानं तीन आठवड्यात, रिलीजच्या 23 व्या दिवशी एकूण 20.49 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
6/9
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे समर्पण आणि शिक्षण व्यवस्थेतील संघर्ष सिनेमात प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक भावनिकरित्या सिनेमाशी जोडले जात आहेत.
advertisement
7/9
चौथ्या आठवड्यातही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. वीकेंडला पुन्हा एकदा हाऊसफुल्ल शो होत असल्याने सिनेमाची एकूण कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर हा वेग कायम राहिला, तर क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम लवकरच दशावतारचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडू शकतो.
advertisement
8/9
2026 च्या पहिल्याच दिवशी क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम हा सिनेमा रिलीज झाला. मराठी सिनेमाची चांगली सुरूवात या सिनेमानं केली आहे.
advertisement
9/9
सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्करराज चिरपुटकर, अनंत जोग, जिज्ञासा तळपदे, जितेंद्र जोशी, सायली संजीव, चिन्मयी सुमित, उदय सबनीस, धनंजय सरदेशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलग तीन आठवडे हाऊसफुल्लचा बोर्ड! 'क्रांतिज्योती विद्यालय'ची छप्परफाड कमाई, 'दशावतार'चा रेकॉर्ड मोडणार?