झालं झिंग झिंग झिंगाट! महाडिकांची तिसरी सून Coming Soon, कृष्णराज-रिंकूच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
krishnaraaj mahadik and rinku rajguru photo : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी तिसरी सून येणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यांचा मुलगा कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
advertisement
1/11

यूट्यूबर, समाजसेवक आणि उद्योजक कृष्णराज महाडिक हा कोल्हापूरकरांच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील 'ताईत' आहे. युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कृष्णा महाडिक त्याच्या कुटुंबाचे अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. पण आता त्याच्या कुटुंबात आणखी एका व्यक्तीचा समावेश होतो असं म्हणायची वेळ आली आहे.
advertisement
2/11
महाडिकांची तिसरी सून 'कमिंग सून' असं म्हणत कोल्हापूरकरांनी कृष्णाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
advertisement
3/11
त्याचं कारणही तितकंच खास ठरलं. कृष्णराज महाडिक आणि अभिनेता रिंकू राजगुरू यांचा फोटो. 10 फेब्रुवारी रोजी दोघांचा कोल्हापूरातील अंबाबाईंच्या मंदिरातील फोटो समोर आला.
advertisement
4/11
हा फोटो कृष्णराज महाडिकच्या फॅन पेजवर km.office वर शेअर करण्यात आला आहे आणि रिंकू आणि कृष्णाच्या नात्याची एकच चर्चा सुरू झाली. दोघांच्या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दोघांनी त्यावर भाष्यही केलेलं नाही. पण दोघांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहेत.
advertisement
5/11
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते. रिंकू लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. अशातच एक फोटो समोर आला आणि रिंकू लग्नाची एकच चर्चा रंगली.
advertisement
6/11
कृष्णाच्या पोस्टवर एका युझरने लिहिलंय, "साहेबांनी सांगितलेलं लगेच मनावर घेतलं का." दुसऱ्या युझरने लिहिलंय, "ते नव्ह जोडा बाकी शोभतोय."
advertisement
7/11
कृष्णाच्या एका चाहत्याने लिहिलंय, "भावा घाबरलो ना... मला वाटलं ठरलं की काय." आणखी एका युझरने लिहिलंय, "कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील आमदार."
advertisement
8/11
तर एका चाहत्यानं लिहिलंय, "केएम तू आणखी चांगल्याला पात्र आहे. पण रिंकूबद्दल द्वेष नाही ती सर्वोत्तम आहे पण केएम वेगळ्याच पातळीवर आहे."
advertisement
9/11
कृष्णाच्या पोस्टवर आणखी कमेंट्स पाहिल्या तर एका युझरने लिहिलंय, "झालं झिंग झिंग झिंगाट...", दुसऱ्या युझरने लिहिलंय, "साहेबांना नाही तर आईंना पाठवा हा फोटो." तर आणखी एका युझरने लिहिलंय, "काय पण म्हणा साहेब, पण जोडी खूप छान दिसतेय."
advertisement
10/11
कृष्णराज हा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. वडिलांच्या नावापेक्षा कृष्णराज त्याच्या कामांमुळे जास्त ओळखला जातो.
advertisement
11/11
जागतिक रेसिंगमध्ये कृष्णराजने ठसा उमटवला आहे. तो एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. युट्यूबमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो समाजकार्य करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
झालं झिंग झिंग झिंगाट! महाडिकांची तिसरी सून Coming Soon, कृष्णराज-रिंकूच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस