TRENDING:

17 वर्षांनी सीक्वेल, हाय TRP! तरी 8 महिन्यांतच गाशा गुंडाळायची वेळ, TV ची फेमस मालिका Off Air?

Last Updated:
हाय TRP असलेली लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कोणती आहे ही मालिका?
advertisement
1/9
17 वर्षांनी सीक्वेल, हाय TRP! तरी 8 महिन्यांतच गाशा गुंडाळायची वेळ, TV ची फेमस मालिका Off Air?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवत आहे. ही बातमी होती छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका बंद होण्याची.
advertisement
2/9
मागील काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अनेक नव्या मालिका सुरू होत असल्यामुळे काही मालिका ऑफ एअर जात आहेत. 
advertisement
3/9
टेलिव्हिजनची हाय TRP असलेली एक मालिका जी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
advertisement
4/9
तब्बल 17 वर्षांनी मालिकेचा सीक्वेल आला. तोही प्रेक्षकांना आवडला. पण आता टेलिकास्टच्या अवघ्या 8 महिन्यात या मालिकेला गाशा गुंडाळावा लागला? 
advertisement
5/9
आपण बोलत आहोत, 'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा दुसरा सीझनबद्दल. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. मालिकेचा घसरमारा टीआरपी आणि रेटिंगमुळे निर्माते शो बंद करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला होता. यानंतर चाहत्यांना नाराजी व्यक्त केली केली. या सगळ्या चर्चा खऱ्या की खोट्या असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. दरम्यान स्टार प्लस वाहिनीने पुढे येत खरं काय ते सांगितलं आहे. मालिकेबाबत त्यांनी महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे.  
advertisement
6/9
नवीन शोच्या अफवा आणि दावे गेल्या आठवड्यात डिजिटल मीडिया आणि विविध गॉसिप पोर्टल्सवर  वाऱ्यासारखी पसरली होती.  तुलसी विराणी यांचा वारसा पुढे नेणारा हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इतकेच नाही, तर 'क्योंकी रिश्तों के भी रूप बदलते हैं' नावाचा एक नवीन मालिका या शोची जागा घेणार अशाही चर्चा होती. 
advertisement
7/9
वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, स्टार प्लसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे एक सडेतोड निवेदन जारी केले. चॅनलने स्पष्टपणे सांगितले आहे की, शो बंद होण्याच्या सर्व अफवा पूर्णपणे निराधार आणि खोट्या आहेत.
advertisement
8/9
चॅनलने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले, "आम्ही अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्स पाहिले ज्यात असा दावा केला जात होता की 'क्योंकी सास भी कभी बहू थी' सीझन 2 संपत आहे आणि त्याच्या जागी एक नवीन शो येणार आहे. आम्ही अधिकृतपणे स्पष्ट करू इच्छितो की या रिपोर्ट्समध्ये अजिबात तथ्य नाही. शो संपवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तसंच संपणार असल्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही."
advertisement
9/9
स्टार प्लसच्या निवेदनानंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 'क्योंकी...' हा केवळ एक शो नाही, तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे, ज्याने सासू-सुनेच्या नात्यातील नाट्याची संकल्पनाच बदलून टाकली. सीझन 2 द्वारे, निर्मात्यांनी तीच जादू पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विराणी कुटुंबाची कथा अजून संपलेली नाही आणि प्रेक्षकांना अजूनही अनेक हाय-व्होल्टेज ड्रामा आणि रंजक वळणे पाहायला मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
17 वर्षांनी सीक्वेल, हाय TRP! तरी 8 महिन्यांतच गाशा गुंडाळायची वेळ, TV ची फेमस मालिका Off Air?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल