TRENDING:

IPL 2026 : कुणी खासदार बनलं, तर कुणी पाकिस्तानी कोच..पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकणारे खेळाडू आता काय करतायत?

Last Updated:
दरम्यान आयपीएलची पहिल्यांदा ट्रॉफी उचलणारे खेळाडू आता काय करतायत? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/15
कुणी खासदार बनलं, तर कुणी पाकिस्तानी कोच..पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकणारे खेळाडू आता काय करतायत?
उद्यापासून आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/15
दरम्यान आयपीएलची पहिल्यांदा ट्रॉफी उचलणारे खेळाडू आता काय करतायत? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/15
खरं तर आयपीएलची सुरुवात ही 2008 पासून झाली होती. या पहिल्याच सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. विशेष त्यावेळी राजस्थानच्या संघात मोठे मोठे खेळाडू नव्हते. पण कर्णधार शेन वॉर्नच्या रणनितीने कमाल केली आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी उचलली.
advertisement
4/15
दरम्यान नुकतीच राजस्थान रॉयल्सच्या टीमची विक्री झाली आहे.त्यामुळे ही टीम चर्चेत आली आहे. या टीमची फायनल प्लेईंग इलेव्हन ही,नीरज पटेल, स्वप्निल असनोदकर, कामरान अकमल (विकेटकिपर), शेन वॉटसन, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, रविंद्र जडेला,शेन वॉर्न (कर्णधार), सिद्धार्थ त्रिवेदी आणि मुनाफ पटेला समावेश होता.
advertisement
5/15
नीरज पटेल राजस्थान रॉयल्सचा ओपनर होता. आयपीएलच्या फायनलमध्ये त्याने 2 धावा केल्या. तर आयपीएलच्या आणखी एका सामन्यात त्याने 29 बॉल 40 धावा करून शेवटच्या बॉलवर सामना जिंकून दिला होता.नीरज देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळायचे. त्याने शेवटचा फर्स्ट क्लास सामना हा 2015 साली खेळला. 100 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 5887 धावा केल्या. 69 लिस्ट ए सामन्यात त्याने 2221 धावा केल्या. तसेच 37 टी20 सामन्यात त्याने 957 धावा केल्या. तसेच ते 2000 साली कैफच्या नेतृत्वातील अंडर 19 संघाचाही भाग होता.
advertisement
6/15
आयपीएल 2008 मध्ये राजस्थानचा दुसरा ओपनर स्वप्निल असनोदकर,याने फायनलमध्ये 28 धावा केल्या होत्या. तसेच त्या लीगमध्ये स्वप्निलने 9 सामन्यात 311 धावा केल्या होत्या.त्यानंतर 2009 ते 2011 पर्यंत आयपीएलमध्ये दिसला पण नंतर गायब झाला.आता तो कोचिंग देतो.
advertisement
7/15
पाकिस्तानचे कामरान अकमल देखील फायनल सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होते. त्याने आयपीएलच्या 6 सामन्यात 128 धावा केल्या होत्या. या सोबत 5 कॅच आणि 4 स्टम्प आऊट देखील घेतले. सध्या तो पाकिस्तानच्या टीव्ही शोवर एक्सपर्ट म्हणून बसतात.
advertisement
8/15
ऑस्ट्रेलियाचा दिग्गद खेळाडू शेन वॉटसन देखील या संघाचा भाग होते. त्याने त्या सीझनमध्ये 472 धावा आणि 17 विकेट काढले होते. तसेच वॉटसनने आयपीएलच्या 145 सामन्यात 3874 धावा आणि 92 विकेट घेतल्या होत्या. सध्या वॉटसन कोलकत्ता नाईट रायडर्सचा असिस्टंट कोच आहे.
advertisement
9/15
तृणमुल कॉग्रेसचे खासदार युसूफ पठाण 2008 च्या आयपीएल फायनमध्ये त्याने 39 बॉल 3 विकेट आणि 56 धावांची अर्धशतकीय खेळी करून मॅचचा निकाल पालटला होता.
advertisement
10/15
या फायनल सामन्यात मोहम्मद कैफचा देखील समावेश होता. कैफेने फायनलमध्ये फक्त 12 धावा केल्या होत्या. तर त्या सीझनमध्ये त्याने 16 सामन्यात 176 धावा केल्या होत्या. सध्या तो कॉमेंन्ट्री आणि क्रिकेट लीग खेळताना दिसतो.
advertisement
11/15
रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का. 2008 साली खेळवलेल्या फायनल सामन्याचा रविंद्र जडेजा हा हिस्सा हौता. फायनलमध्ये तो शुन्यावर बाद झाला होता आणि गोलंदाजीची देखील त्याला संधी मिळाली नव्हती.
advertisement
12/15
शेन वॉर्न हा राजस्थान रॉयल्स टीमचा कर्णधार आणि कोच होता. 2022साली थायलंडमध्ये वेकेशनवर गेलेल्या शेन वॉर्नच निधन झालं होतं.
advertisement
13/15
पाकिस्तानी गोलंदाज सोहेल तन्वीरचा देखील राजस्थान रॉयल्सच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होता. सोहेलने त्या आयपीएलमध्ये 11 सामन्यांत 22 विकेट घेतले. तन्वीरने पाकिस्तान ज्युनियर निवड समितीचे प्रमुख म्हणूनही काम केले होते.
advertisement
14/15
सिद्धार्थ त्रिवेदी देखील राजस्थानच्या विजेत्या संघाचा भाग होता, त्याने त्या हंगामात 15 सामन्यांत 13 विकेट घेतले होते. शेन वॉर्ननेही त्याचे खूप कौतुक केले होते. 2013 मध्ये, जेव्हा आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगचा मुद्दा समोर आला, तेव्हा त्रिवेदीने सांगितले की त्याच्याशीही अनेक लोकांनी संपर्क साधला होता. तपासानंतर, बीसीसीआयने त्याला भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत दोषी ठरवले. त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली. तो आता लीगमध्ये क्रिकेट खेळताना दिसतो.
advertisement
15/15
मुनाफ पटेल देखील 2008 च्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने त्या आयपीएल हंगामात 15 सामन्यांत 14 विकेट घेतले होते. अंतिम सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असलेला मुनाफ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सध्या २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : कुणी खासदार बनलं, तर कुणी पाकिस्तानी कोच..पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकणारे खेळाडू आता काय करतायत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल