Lata Mangeshkar यांचं 3 मिनिटे 54 सेकंदाचं हे रोमँटिक साँग आजही तेवढंच हिट; तुमच्या प्ले लिस्टमध्ये आहे?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Lata Mangeshkar : लता मंगेशकर आज हयात नसल्या तरी त्यांनी गायलेल्या गाण्यांची जादू आजही तशीच अमर आहे. अशाच एका गाण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इतकेच नाही तर 63 वर्षांनंतरही लता दीदींचे हे गाणे आजही हिट आहे.
advertisement
1/7

लता मंगेशकर यांनी आपल्या गायन कारकिर्दीत एकापेक्षा एक सुंदर गाणी गायली आहेत. आजच्या काळातही त्यांची गाणी आवर्जुन ऐकली जातात.
advertisement
2/7
लता मंगेशकर यांचं आयकॉनिक गाणं आज 63 वर्षांनंतरही अमर आहे. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणं असतं म्हणजे असतंच.
advertisement
3/7
लता मंगेशकर यांनी 1948 मध्ये आलेल्या 'मजबूर' या चित्रपटातील गाण्याद्वारे पार्श्वगायिका म्हणून हिंदी सिनेमात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांच्या 70 वर्षांच्या गायकी कारकिर्दीत त्यांनी अनेक स्मरणीय गाणी गायली. परंतु त्यापैकी एक गाणे असेही आहे, जे रिलीजला सहा दशकांनंतरही प्रेक्षकांना ऐकायला आवडते. अभिनेता देव आनंद यांच्या चित्रपटातील हे गाणे आजही सुपरहिट मानले जाते आणि लता जींच्या आवाजात त्याची सुंदरता दुपटीने वाढते.
advertisement
4/7
तेरा मेरा प्यार अमर (Tera Mera Pyar Amar) असं या गाण्याचं नाव आहे. 1962 मध्ये देव आनंद यांच्या असली नकली चित्रपटातील हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलेल्या सदाबहार गाण्यांपैकी एक आहे.
advertisement
5/7
तेरा मेरा प्यार अमर हे गाणं अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित केलेले आहे. 3 मिनिटे 54 सेकंदांचे 'तेरा मेरा प्यार अमर' हे एक रोमँटिक गाणं आहे आणि जुन्या काळातल्या प्रेक्षकांप्रमाणेच नव्या पिढीतही हे गाणं हिट आहे.
advertisement
6/7
तेरा मेरा प्यार अमर हे गाणं संगीतकार शंकर-जयराज किशन यांच्या जोडीनं तयार केलं आहे. तर दिग्गज गीतकार शैलेंद्र यांनी याचे बोल लिहिले आहेत.
advertisement
7/7
लता मंगेशकर यांनी 2022 मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्याआधी त्यांनी हिंदीसह इतर 14 भाषांमध्ये अंदाजे 50 हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. असली नकली चित्रपटातील 'तेरा मेरा प्यार अमर' हे त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट गाणं मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Lata Mangeshkar यांचं 3 मिनिटे 54 सेकंदाचं हे रोमँटिक साँग आजही तेवढंच हिट; तुमच्या प्ले लिस्टमध्ये आहे?