TRENDING:

नॅशनल अवॉर्ड्समध्ये लॉबिंग होतं? परेश रावल यांचा शॉकिंग खुलासा, म्हणाले, 'ऑस्करमध्येही...'

Last Updated:
लवकरच 'हेरा फेरी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अभिनेते परेश रावल यांनी पुरस्कारांमधील लॉबिंगवर भाष्य करत राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर आणि यशाच्या मापदंडावर आपली स्पष्ट मते मांडली.
advertisement
1/7
नॅशनल अवॉर्ड्समध्ये लॉबिंग होतं? परेश रावल यांचा शॉकिंग खुलासा
बॉलिवूड अभिनेते परेश रावल हे बॉलिवूडमधील काही स्पष्टवक्त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. नुकतंच यांनी चित्रपट पुरस्कारांबद्दल उघडपणे भाष्य केले. राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारांमध्ये लॉबिंगबद्दल ते बोलले.  ऑस्कर देखील त्यापासून वेगळा नाही असंही त्यांनी म्हटलं.  
advertisement
2/7
चित्रपट पुरस्कारांच्या विश्वासार्हतेबद्दल राज शमानी यांच्याशी बोलताना परेश रावल म्हणाले, "मला पुरस्कारांबद्दल माहिती नाही. मी असेही म्हणू इच्छितो की राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निश्चितच काही लॉबिंग असते. ते इतर पुरस्कारांइतके नाही. तुम्ही इतर पुरस्कारांबद्दल बोला किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार आहे, तो प्रतिष्ठित आहे."
advertisement
3/7
परेश रावल यांनी पुढे स्पष्ट केले की, "लॉबिंग केवळ भारताच्या पुरस्कार सिस्टिममध्ये मर्यादित नाही. ऑस्करमध्येही लॉबिंग होते आणि ही प्रक्रिया बहुतेकदा नेटवर्किंगभोवती फिरते."
advertisement
4/7
अनेक कलाकार पुरस्कारांना यशाचं मापदंड मानतात पण परेश रावल यांचं याबाबतचं मत वेगळं आहे. त्यांनी म्हटलं, "अवॉर्ड म्हणजे आपल्या क्षेत्रातील लोकांकडून मिळालेली एक मान्यता असते. पण माझ्यासाठी त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व कोण करतं? दिग्दर्शक, जेव्हा दिग्दर्शक कट' म्हणतो."
advertisement
5/7
"जेव्हा लेखक सांगतो की तो माझ्या कामाने खुश आहे. तेव्हाच माझ्यासाठी तोच खरा पुरस्कार असतो. तेच माझं प्रेरणास्थान, माझी इच्छा आणि समाधान आहे. त्यापुढे मी काहीच पाहत नाही.”
advertisement
6/7
ते पुढे म्हणाले, "माझ्या दिग्दर्शकाला आणि लेखकाला माझ्या कामाबद्दल तितकं माहिती आहे, त्यांच्याकडून जर 'अरे परेश रावल, अप्रतिम!’ असं ऐकलं, तर सगळं संपतं. तोच माझा खरा सन्मान आहे."
advertisement
7/7
"जर काही मोजके जवळचे लोक म्हणाले की वा काय काम केलंय, तर सोने पे सुहागा", असंही परेश रावल म्हणाले. दरम्यान परेश रावल हे फिर हेरा फेरी 3मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसोबत नाराजी नाट्यानंतर परेश रावल पुन्हा सिनेमात इन झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नॅशनल अवॉर्ड्समध्ये लॉबिंग होतं? परेश रावल यांचा शॉकिंग खुलासा, म्हणाले, 'ऑस्करमध्येही...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल