TRENDING:

World Cup ची एकही मॅच न जिंकणाऱ्या पाकिस्तानला किती पैसे मिळाले? आकडा पाहून शॉक व्हाल!

Last Updated:

महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीने टीम इंडियावर पैशांचा वर्षाव केला आहे, पण या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच न जिंकणाऱ्या पाकिस्तानलाही आयसीसीकडून पैसे देण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 1983 मध्ये भारतीय पुरुष टीम पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकली होती, तर महिला टीमला हा क्षण अनुभवायला 2025 साल उजाडलं. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला टीमने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली. शफालीने 87 रनची खेळी करून 2 विकेट घेतल्या, तर दीप्तीने अर्धशतकासह 5 विकेट मिळल्या. या ऐतिहासिक विजयासाठी भारतीय टीमला आयसीसीकडून अंदाजे 40 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. आयसीसीने महिला वर्ल्ड कपसाठी अंदाजे 123 कोटी रुपयांचा बक्षीस निधी निश्चित केला होता.
World Cup ची एकही मॅच न जिंकणाऱ्या पाकिस्तानला किती पैसे मिळाले? आकडा पाहून शॉक व्हाल!
World Cup ची एकही मॅच न जिंकणाऱ्या पाकिस्तानला किती पैसे मिळाले? आकडा पाहून शॉक व्हाल!
advertisement

टीम इंडियाला किती पैसे मिळाले?

आयसीसीने महिला वर्ल्ड कपसाठी 123 कोटी रुपयांचा बक्षीस निधी निश्चित केला होता. टीम इंडियाला चॅम्पियन बनल्याबद्दल अंदाजे 40 कोटी रुपयांचे बक्षीस निधी मिळाले. हे 2023 च्या पुरुष वनडे वर्ल्ड कपच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे. 2023 च्या पुरुष वनडे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला अंदाजे 33 कोटी रुपये मिळाले. शिवाय, ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी प्रत्येक टीमला अंदाजे ₹30.3 लाख मिळाले.

advertisement

कोणाला किती पैसे मिळाले?

फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीमला, म्हणजेच उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला, अंदाजे ₹20 कोटी मिळाले. सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला प्रत्येकी अंदाजे ₹10 कोटी मिळाले. पाचव्या ते आठव्या स्थानावर राहिलेल्या श्रीलंका आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या न्यूझीलंडलाही लाखो रुपये मिळाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

पाचव्या स्थानावर राहिलेल्या श्रीलंका आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या न्यूझीलंडला प्रत्येकी अंदाजे ₹ 6.2 कोटी रुपये मिळाले. बांगलादेश (सातव्या स्थानावर) आणि आठव्या स्थानावर राहिलेल्या पाकिस्तानला अंदाजे ₹2.5 कोटी रुपये देण्यात आले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान ही एकमेव टीम होती ज्यांना एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने ग्रुप स्टेजच्या 7 पैकी 4 सामने गमावले आणि त्यांचे 3 सामने पावसामुळे रद्द झाले. याशिवाय ग्रुप स्टेजमधील प्रत्येक टीमला स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल 22 लाख रुपये वेगळे देण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup ची एकही मॅच न जिंकणाऱ्या पाकिस्तानला किती पैसे मिळाले? आकडा पाहून शॉक व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल